महाराष्ट्रातील जनतेसाठी गुड न्यूज,समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला, किती लागला खर्च, जाणून घ्या
Samruddhi Highway, Eknath Shinde, Devendra Fadnavis : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील सर्वाधिक लांभीचा महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट्स अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि 4 थ्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासियांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले ते आज चौथ्या टप्प्याचे लोकार्पण हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची देखील उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी समृद्धी महामार्गाला किती खर्च लागला याची देखील माहिती दिली.
तब्बल 61 हजार कोटी रुपयांचा खर्च करुन 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (76 किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी, बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समृद्धी महामार्गाची उपयुक्तता आणि त्यासाठी लागलेला खर्च, स्टील व सिमेंटची देखील माहिती दिली.

काय म्हणाले अजित पवार?
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण करताना अजित पवार म्हणाले की, प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल, प्रवास वेगवान होईल. त्याचप्रमाणे औद्योगिकीकरणास चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल. हा महामार्ग महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्धी आणणारा ठरला आहे, अनेक जिल्हे याला जोडले गेले आहेत.
दर पाहून लोकांनी आमची साथ सोडली
आज जागतिक पर्यावरण दिन असून आजच्या दिवशी या प्रकल्प पूर्णत्वास व लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, या महामार्गाच्या कामाला जेव्हा सुरुवात झाली. तेव्हा मी विरोधात होतो. आम्ही त्याला विरोध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला हॉलमध्ये मीटिंग घेतली. पण, नंतर ज्यावेळी भूसंपादनाचा दर जाहीर केला तेव्हा ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनीच जाऊन पैसे घेतले, असाही किस्सा त्यांनी सांगितला.
12 कोटी सिमेंट बॅग, 7 लाख मेट्रिक टन स्टील?
समृद्धी महामार्गासाठी 55 हजार 500 कोटींची खर्च अपेक्षित होता. पण, हा खर्च 61 हजारांवर पोहोचला आहे. या महामार्गासाठी तब्बल 12 कोटी सिमेंट बॅग वापरण्यात आल्या असून स्टीलही मोठ्या प्रमाणात वापरले आहे. 7 लाख मेट्रिक टन स्टीलचा उपयोग रस्ता उभारण्यासाठी करण्यात आला आहे. हा महामार्ग म्हणजे फार मोठं काम राज्यासाठी झालं आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आणि आता ते मुख्यमंत्री असताना उद्घाटन होते असे क्वचित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे योगदान लाभले हे विसरून चालणार नाही. आमच्या ऑडी गाडीचे सारथ्य एकनाथ शिंदे यांनी केले, मी बघत होतो व्यवस्थित आहे की नाही, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला. आधी मुख्यमंत्री असणारे आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री हे बाबा गाडीवर बसल्यावर व्यवस्थित चालेल का नाही. मी म्हटलं मला LC द्या निरंजन डावखरेची होती तो आधीचा राष्ट्रवादीचा असल्याने त्याला म्हटलं दे गाडी, असा आजच्या कार्यक्रमातील मजेशीर किस्सा अजित पवारांनी सांगितला.
120 च्या स्पीडने चालवली गाडी
महामार्गावर कार चालवताना देवेंद्र फडणवीसांनी थेट 120 स्पीड पकडला अनिल गायकवाड यांना विचारलं कितीची वेग मर्यादा आहे, ते म्हणाले 120 आहे बोगद्या आधी, बोगदा आला की 100. मी बघत होतो टनेलमधे आल्यावर किती वेग आहे, तेव्हा शंभरच वेग होता. आम्ही सर्व नियमांचे पालन केले आम्ही उतरवलेल्या विम्याचा उपयोग करावा लागला नाही, अशी मिश्कील फटकेबाजी अजित पवारांनी यावेळी लगावली.












Click it and Unblock the Notifications