Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकऱ्यांनो काळजी करू नका, राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी- कृषीमंत्री धनंजय मुंडे

परभणी : मराठवाड्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परभणी जिल्ह्यातील मानवत, पाथरी, सेलू आदी तालुक्यांमध्ये नुकसान झालेल्या शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्य सरकार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये, झालेल्या नुकसानीचा पूर्णपणे मोबदला मदतीच्या स्वरूपात राज्य शासनाकडून मिळेल, असा शब्द कृषीमंत्री मुंडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिला. पावसाच्या अतिप्रवाहाने तसेच नदीतील प्रवाहाचे पाणी शेत जमिनींमध्ये घुसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी मधील माती पूर्णपणे खरडून गेली आहे त्याही ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत दिली जाईल, असेही आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.

Dhananjay Munde

राज्य सरकार या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुंडे यांनीशेतकरी बांधवांशी संवाद साधताना दिला.तसेच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या जमिनींच्या नुकसानीची मदत स्वतंत्रपणे दिली जाईल. तसेच मागील पिकविम्याची थकीत बाकी तातडीने वितरित करण्याचे निर्देशही संबंधितांना दिले आहेत.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिका-यांना तात्काळ पंचनामे सुरू करून मदतीचे अहवाल राज्य शासनाकडे तात्काळ पाठवावेत असे निर्देश दिले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+