Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आचार्य देव यांनी घेतली शपथ! शेतकरी ते शिक्षणतज्ज्ञ.. महाराष्ट्राच्या राज्यपालाबद्दल 5 मुद्द्यात वाचा

Acharya Devvrat takes oath farmer to educationist : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज राजभवनात महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च नायायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली. आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपास्थित होते.

Acharya Devvrat takes oath farmer to educationist

सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. आचार्य देवव्रत हे २०१९ पासून गुजरातच्या राज्यपालपदी आहेत. त्याआधी १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली.

उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा सी. पी. राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे संवैधानिक पदी आता गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले आहे.

रेल्वेने केला प्रवास

राज्यपाल आचार्य देवव्रत काल दुपारनंतर (१४ सप्टेंबर) अहमदाबादहून तेजस एक्सप्रेसने मुंबईला पोहचले. राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी देखील उपस्थित होत्या. आज १५ सप्टेंबर रोजी सोमवार, सकाळी ११ वाजता राजभवन, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शेतकरी, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणापासून राज्यपालपर्यंत त्यांचा प्रवास आहे. त्यांच्याबद्दल खास माहिती 5 मुद्यात जाणून घेऊया.

१. राजकीय प्रवास

आचार्य देवव्रत हे सध्या गुजरातचे २० वे राज्यपाल आहेत. त्यांनी जून २०१९ मध्ये हे पद स्वीकारले. त्यापूर्वी, ते हिमाचल प्रदेशचे १८ वे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विविध राज्यांमध्ये महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर काम केले आहे.

२. शिक्षण आणि सामाजिक योगदान

एक प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. ते आर्य समाजाचे एक प्रमुख प्रचारक आहेत आणि समाजाच्या कल्याणासाठी ते विविध उपक्रम राबवतात.

३. नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते

आचार्य देवव्रत हे नैसर्गिक शेतीचे (Natural Farming) मोठे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी १८० एकर जमिनीवर नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे, ज्यामुळे त्यांना या पद्धतीचे महत्त्व पटले. ते रासायनिक शेतीच्या विरोधात आहेत आणि नैसर्गिक शेतीला 'जीवदान' देणारी पद्धत मानतात.

४. शेतीबद्दलचे विचार

त्यांच्या मते, नैसर्गिक शेती करणे हे देवांना प्रसन्न करण्यासारखे आहे. नर्मदा येथील शिबिरात बोलताना त्यांनी म्हटले की, "तुम्ही नैसर्गिक शेती करायला लागलात, तर देव आपोआपच प्रसन्न होईल." ते सध्याच्या रासायनिक शेतीला पर्यावरणासाठी आणि प्राण्यांसाठी हानिकारक मानतात.

५. मानवी स्वभावावर भाष्य

राजकीय आणि सामाजिक भूमिकेसोबतच, त्यांनी मानवी स्वभावावरही भाष्य केले आहे. ते म्हणतात की, "मनुष्य हा असा प्राणी आहे, त्याच्यासारखा ढोंगी, कृत्रिम आणि दांभिक दुसरा कोणी नाही." या विधानातून त्यांचा मानवी स्वभावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+