यंदा बच्चू कडू यांचा होऊ शकतो पराभव? अचलपूरच्या बालेकिल्ल्यात 'या' उमेदवाराचे आहे कडवे आव्हान!
Achalpur Assembly Constituency Bablu Deshmukh challenges Bachchu Kadu : बच्चू कडू हे नाव माहीत नाही, अशी एकही व्यक्ती महाराष्ट्रात नसेल. सत्तेत असूनही सतत वेगवेगळे आंदोलन, आक्रमकपणा, कधी अधिकार्यांना मारहाण यामुळे आमदार बच्चू कडू कायम चर्चेत असतात. कुठलेही मोठे पाठबळ किंवा मोठ्या पक्षाचा पाठिंबा नसतानाही बच्चू कडू अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सतत दोन दशकांपासून निवडून येत आहेत.
येत्या विधानसभा निवडणुकीतही बच्चू कडू रिंगणात उतरतील, हे निश्चित आहे. मात्र, त्यांच्याविरोधात स्थानिक राजकारणात मोठे आव्हान तयार झाले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांचा विजय यावेळी इतका सोपा असणार नाही, त्यांचा पराभवही होऊ शकतो असेही काही राजकीय जाणकार सांगतात.

बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास
बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख असून, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे त्यांना विदर्भात एक वेगळे स्थान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत. स्वतःच्या मतदार संघातही त्यांची पकड मजबूत आहे. उमेदीच्या काळात पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी स्वतःची प्रहार ही संघटना स्थापन केली.
आता प्रहार राजकीय पक्ष आहे. याच पक्षाकडून कडू हे चार वेळा अचलपूर मतदार संघातून निवडणूक आले. मात्र, 2024 च्या निवडणुकीत बच्चू कडूंना सत्ता विरोधी लाटेला सामोरे जावे लागू शकते. विरोधकांनी ही लाट 'कॅश' करण्यासाठी आपली व्यूहरचना तयार केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील परिणाम आणि स्थानिक राजकारण
बच्चू कडू महायुतीत सहभागी आहेत. परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला होता. लोकसभा निवडणुकीत प्रहारचे दिनेश बूब यांना 85 हजार 300 मते मिळाली. मात्र, अचलपूर मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखडे यांनी 6 हजार 793 मतांनी आघाडी घेतली. या पराभवामुळे विरोधकांनी बच्चू कडूंवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
हे आहेत संभाव्य उमेदवार
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बबलू देशमुख हे संभाव्य उमेदवार म्हणून समोर येत आहेत. देशमुख हे अमरावती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. सध्या कॉंग्रेससचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी या मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात कॉंग्रेसला विजय मिळाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याचबरोबर भाजपकडून सुधीर रासे, नंदू वासनकर, प्रवीण तायडे यांची उमेदवारीची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडी, रिपाइं, मनसे यांच्याकडूनही उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडूंना सर्वपक्षीय विरोधाचा सामना करावा लागू शकतो.

भाजपची स्थिती आणि आव्हाने
भाजपचे या मतदारसंघात मजबूत अस्तित्व आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील भाजपचे प्रत्येकी पाच सदस्य होते. यातून पक्षाची ग्रामीण भागात असलेली पकड दिसते. जर निवडणुकीपूर्वी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडले तर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे. मात्र, बच्चू कडू यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे भाजपला या मतदारसंघात अधिक चांगली रणनीती आखावी लागेल.
गतवेळी काय झाले होते?
अचलपूर मतदारसंघातून सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू 8 हजार 396 मतांनी विजयी झाले होते. बच्चू कडू यांना 81 हजार 252 मते, तर कॉंग्रेससचे अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांना 72 हजार 856 मते मिळाली होती. त्यापूर्वी 2014 च्या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांनी भाजपाचे अशोक बनसोड यांना पराभूत करून विजयाची हॅटट्रीक केली होती. आता याही वेळी कडू विरुद्ध देशमुख अशी लढत असणार आहे.
प्रमुख समस्या आणि विकासाची गरज
अचलपूर मतदारसंघात अजूनही काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. नळयोजनेअभावी गावातील लोकांना पाण्यासाठी हाल सोसावे लागतात. अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे, तर एमआयडीसी नसल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी इतर महानगरांकडे जावे लागते. या प्रश्नांना बच्चू कडूंनी काही प्रमाणात सोडविण्याचा प्रयत्न केला असला, तरीही काही समस्या आजही कायम आहेत.
मुस्लिम आणि कुणबी-मराठा मतदारांचा निर्णयक प्रभाव
या मतदारसंघात 40 ते 50 हजार मुस्लिम मतदार असून, हे मतदान अत्यंत निर्णायक ठरू शकते. याशिवाय, कुणबी-मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतदारवर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवार आक्रमकपणे प्रचार करतील.
नेमके काय होणार?
अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू यांच्यासमोर मोठी लढाई आहे. त्यांच्या कामाची एक बाजू जनतेच्या मनात स्थिर आहे, पण सत्ता विरोधी लाट आणि स्थानिक असंतोषामुळे विरोधकांना चांगली संधी मिळू शकते. या मतदारसंघात भाजप, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि अन्य पक्षांमध्ये कडवी लढत होण्याची शक्यता आहे.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications