पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अबु आझमींची प्रतिक्रिया; पुलवामाचा उल्लेख अन् गुप्तचर यंत्रणेंवर आरोप
Abu Azmi on Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 28 लोकांचा मृत्यू झाला. एकीकडे संपूर्ण देश या घटनेमुळे संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकारच्या वतीने दहशतवाद्यांना संपविण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातील लोकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर कोणी या घटनेवरुन मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. अशातच आता समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला.
काय म्हणाले अबू आझमी?
समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. ते एनआयआयशी बोलत होते. ते म्हणाले की, या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या हल्ल्यानंतर आता भारत सरकारने पाकिस्तानशी सर्व संबंध तोडावेत, अशी मागणी देखील त्यांनी केली. तर या हल्ल्याला प्रामुख्याने सरकारी गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्या, असा आरोप देखील त्यांनी लावला.

पुलवामा हल्ल्यावर काय म्हणाले अबू आझमी?
अबू आझमी पुढे बोलताना म्हणाले की, तिथे पर्यटनासाठी गेलेल्या लोकांसोबत ही घटना घडली याबद्दल मला वाईट वाटते. मला आणि संपूर्ण देशाला याबद्दल खूप दुःख झाले आहे. पण ही सरकारची जबाबदारी आहे. कलम 370 हटवल्यानंतर आणि नोटाबंदीनंतर दहशतवादी कारवाया संपतील, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता.
विशेष म्हणजे यापूर्वी पुलवामा येथे हल्ला झाला होता. पण त्याचा योग्य अहवालच आतापर्यंत समोर आलेला नाही. घडलेल्या घटनेवर कठोर कारवाई झाली पाहिजे. हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. जर ते वारंवार म्हणत असतील की लोक पाकिस्तानातून येत आहेत, तर ते पाकिस्तानशी संबंध का ठेवत आहेत. त्यांच्याशी असलेले सर्व संबंध केंद्र सरकारने तोडले पाहिजे.
#WATCH | #PahalgamTerrorAttack | Mumbai: Samajwadi Party leader Abu Azmi says, "I am distressed about what happened. People had taken their kids on vacations... The government had said that terrorism would end after the abrogation of Article 370 and demonetisation. The details of… pic.twitter.com/duDHUbhghC
— ANI (@ANI) April 23, 2025
धर्माच्या नावाखाली खपवू नका
सपा नेते आझमी म्हणाले की, सत्तेत असलेले लोक प्रत्येक गोष्टीत मुस्लिमांचे नाव घेतात. प्रत्येक गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. जर तुम्ही म्हणत असाल की लोकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यांना ठार करण्यात आले. तर जर त्यांच्याकडे इतका वेळ होता, तर आपले पोलिस आणि सुरक्षा दल कुठे होते? धर्माच्या नावाखाली हा हल्ला खपवू नका, असेही ते म्हणाले.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे -
संभाजीनगरात पंचायत समिती निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; अंबादास दानवेंचा भाजप उमेदवारावर हल्ला







Click it and Unblock the Notifications