'आप'चा काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीची निवडणूक स्वबळावर लढणार
Delhi Assembly Election- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. काँग्रेसला तर अवघ्या १६ जागाच जिंकता आल्या. या निकालानंतर इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमध्ये धुसफूस सुरु असल्याचे बोलले गेले. त्यातच आता काँग्रेसला धक्का बसेल, अशी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. हा काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

केजरीवालांनी घेतली पत्रकार परिषद
केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पक्षाचा निर्णय जाहीर केला. केजरीवाल म्हणाले की, "आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी करणार नाही. आमच्या पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे". अरविंद केजरीवाल यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच्या काही निवडणुकांत इंडिया आघाडीत असूनही आपने काही धक्कादायक निर्णय घेतले होते. आता याच धक्कादायक निर्णयाची पुनरावृत्ती, आपने दिल्ली निवडणुकीसाठीही कायम ठेवली आहे.
दिल्लीत दिसणार तिरंगी लढत
महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने काहीच निर्णय घेतला नव्हता. त्यापूर्वी हरियाणातील निवडणुकीत काँग्रेसने आपला सोबत घेतले नव्हते. त्यावेळीच आप नाराज असल्याचे बोललं जात होतं. हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड अपयशाचा सामना करावा लागला. अडचणीत असलेल्या काँग्रेसची साथ आता आपनेही सोडली आहे. दोन राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता आम आदमी पार्टीने काँग्रेसबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांच्या पक्षाने दिल्लीची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवालांच्या या निर्णयामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आप, भाजपा व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
हरियाणापासून होता वाद
काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत आप व काँग्रेस दोघेही होते. मात्र त्या निवडणुकीत आपला काँग्रेसचा काहीच फायदा झाला नाही. दुसरीकडे हरियाणातील निवडणुकीत काँग्रेसला सत्तेची स्वप्ने पडू लागल्यावर त्यांनी मित्रपक्षांची साथ घेणं टाळलं. सुरुवातीला आप व काँग्रेसमध्ये आघाडी करण्याबाबत चर्चा झाली. मात्र आपला काँग्रेसने अधिक जागा देण्यास नकार दिल्यानंतर तिथे आघाडी होऊ शकली नाही. परिणामी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. या राज्यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासून आपचं काँग्रेससोबत बिनसल्याचं बोललं जात होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications