आर्थिक राजधानीत चाललंय काय? भर रस्त्यात जमावाच्या मारहाणीत तरुणाची हत्या, कसा घडला थरार!
Mumbai Crime News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई सध्या विशेष चर्चेत आहे. धारावी येथे एका हिंदुत्ववादी तरुणाचा भर रस्त्यात पाठलाग करून खून करण्यात आला. विजयादशमीच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे येथे नुकतीच हत्या करण्यात आली.
या घटनेचे पडसाद सर्वच क्षेत्रात उमटत आहेत. राज्याच्या गृहमंत्रालयावर आणि पोलिसांच्या कारभारावर चौफेर टीका होत असतानाच मुंबईत भर रस्त्यात जमावाने एका तरुणाला मारहाण करून ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आकाश माईन असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती पुढे येत आहे.

ओव्हरटेकच्या किरकोळ वादातून घडली घटना
संतप्त जमाव एका तरुणाला बेदम मारहाण करीत असून त्याला वाचवण्यासाठी एक महिला पीडित तरुणाच्या अंगावर झोपली असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आणखी एक व्यक्ती त्या तरुणाला वाचवण्यासाठी गयावया करीत आहे लोकांच्या पाया पडत आहे, पण जमावाकडून त्या व्यक्तीलाही बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक केल्याच्या किरकोळ वादातून ही मारहाण झाल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे.
Maharashtra | A man named Akash Main was beaten to death in the Goregaon area of Mumbai after there was a clash over overtaking. Dindoshi Police of Mumbai registered a case of murder and arrested 9 accused. All the accused were produced in the court where the court sent all of…
— ANI (@ANI) October 14, 2024
आईचा टाहो, पित्यालाही मारहाण
गोरेगाव येथे ही घटना घडली आहे. मृत तरुणावर झोपलेली स्त्री ही त्याची आई असून ती जमावाला आपल्या मुलाला न मारण्याची विनंती करीत होती. मात्र जमावाने तिच्या विनंतीला न जुमानता तरुणाला मारहाण करणे सुरूच ठेवले. जमावाला विनवणी करणारा वयस्कर हा त्या तरुणाचा पिता असून जमावाने त्या वयस्कर व्यक्तीलाही मारहाण केल्याचे चित्रफितीत दिसून येत आहे. भर रस्त्यात भर दिवसा एवढा भीषण प्रकार घडत असताना पोलीस तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे एका उद्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
नऊ जणांना अटक आणि पोलीस कोठडी
घटना घडल्यानंतरया प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने सर्वांना 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करीत आहेत.
पोलीस दलाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान पोलिसांच्या कारभारावर संशय निर्माण करणाऱ्या अनेक घटना महाराष्ट्रात अलीकडे घडल्या आहेत. पुणे येथे पोर्शे वाहन अपघात घटनेत धनाढ्य तरुणाला वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न उघडकीस आला. बदलापूर येथे घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांचे तातडीने निलंबन करण्यात आले. या दोन्ही घटना वरून विरोधकांनी पोलीस दलावर चौफेर टीका करण्यास सुरुवात केली होती. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडून गेल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यात आता गोरेगाव सारख्या मराठमोळ्या परिसरात एका तरुणाला भर रस्त्यात जमावाने ठार मारल्याची घटना घडल्यामुळे पोलीस दलावर आणखी टीका होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications