९ मे या तारखेला पाकिस्तान का घाबरतोय? ९ मे पाकसाठी पुन्हा काळा दिवस बनेल का?
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे पाकिस्तान सरकार आणि त्यांचे सैन्य खूपच घाबरले आहे. त्यांना भीती आहे की २०२३ प्रमाणे ९ मे हा दिवस पुन्हा एकदा त्यांच्यासाठी काळा दिवस बनू शकतो. ९ मे २०२३ च्या दिवशी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात पाकिस्तानचे अतिशय मोठे नुकसान झाले होते.

लष्कराच्या इमारतींसह ४० सरकारी इमारतींचे मोठे नुकसान झाले होते. आज, जेव्हा भारताच्या अचूक आणि शक्तिशाली लष्करी कारवायांनी पाकिस्तानच्या नापाक योजना वारंवार हाणून पडल्या आहेत, तेव्हा ही भीती आणखी वाढली आहे.
शुक्रवार, ९ मे २०२५ रोजी, ड्रोन हल्ल्यांच्या मालिकेने पाकिस्तानमध्ये कहर माजवला. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सतत गोळीबार आणि तणाव शिगेला पोहोचला आहे. सतर्क भारतीय सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक कट हाणून पाडला आहे, ज्यामुळे तेथील सैन्य आणि सरकारमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पाकिस्तानी प्रशासनाला भीती आहे की भारताचा बदला आणि अंतर्गत अस्थिरता ९ मे रोजीचा दिवस आणखी एका काळ्या अध्यायात बदलू शकतो.
दंगलींनी पाकिस्तान हादरला
९ मे २०२३ रोजीही शाहबाज पंतप्रधान होते आणि असीम मुनीर लष्करप्रमुख होते. या दिवशी असे दंगे झाले की आजही त्यांना भीती वाटते. त्यानंतर इम्रान खान यांच्या अटकेनंतर जमाव हिंसक झाला आणि त्यांनी सरकारी इमारती आणि लष्करी तळांवर हल्ला केला. रावळपिंडी येथील आर्मी कॉर्प्स कमांडरचे निवासस्थान, जनरल मुख्यालय, पाकिस्तान एअर फोर्सचा आलम एअरबेस, फैसलाबादमधील आयएसआय कार्यालय आणि चक्रामधील फ्रंटियर कॉर्प्स किल्ला यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे अंदाजे दोन अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले. हा पाकिस्तानच्या अंतर्गत कमकुवतपणा आणि अस्थिरतेचा मोठा पुरावा होता.
पाकिस्तानसाठी हा काळा दिवस असेल का?
गुरुवारी रात्री भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि सीमेपलीकडून होणारे कट उद्ध्वस्त केल्याने, जनरल मुनीर आणि शेहबाज शरीफ यांना भीती आहे की ९ मे २०२५ हा त्यांच्या इतिहासातील आणखी एक काळा दिवस बनू शकतो. भारताच्या लष्करी सामर्थ्याने आणि राजनैतिक वर्चस्वाने पाकिस्तानला प्रत्येक आघाडीवर पराभूत केले आहे. सीमेवरील त्यांच्या प्रत्येक कृतीला योग्य उत्तर दिले जात आहे आणि ड्रोन हल्ल्यांद्वारे त्यांच्या आर्थिक आणि धोरणात्मक कमकुवतपणा उघड होत आहेत.
पाकिस्तानकडून मागितली जातेय कर्जाची भीक
पाकिस्तानी हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानची महत्वाच्या शहरावर जोरदार हल्ले केले. यानंतर पाकिस्तान आता संकटाच्या खाईत सापडला आहे. पाकिस्तानवर आर्थिक संकट घोंगावत असून त्यांनी विश्वबँकेकडे हात पसरले आहेत.यासंदर्भात एनआयने त्यांच्या वृत्तात पाकिस्तानी सरकारने एक्सवरील पोस्ट सामाईक केली आहे आणि जागतिक बँकैकडे कर्जाची मदत मागितल्याची माहिती दिली आहे. यावरुन पाकिस्तानची आर्थिक स्थिती किती चिंताजनक आहे हेही स्पष्ट होते.












Click it and Unblock the Notifications