धर्मावरुन मारले,लष्करचा हात होता का?, पहलगामवरुन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने PAKला फटकारले!
United nations on Pahalgam Attack target to Pakisthan : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. अशातच, पाकिस्तान मोठ्या उत्साहाने न्यायासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धावत गेला. परंतु, तिथे उलटंच झाल्याचे पाहायला मिळाले आहे. युएनएससीने त्यांना पुन्हा एकदा अपमानित केले आहे.
नेमकं काय घडलंय!
पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक व राजकीय दृष्ट्या कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सिंधु जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानची तर हवाच निघून गेली. त्यामुळे पाकिस्तानच्या वतीने संयुक्त राष्ट्र परिषदेत दाद मागण्यासाठी गेले. या ठिकाणी पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रांच्या देशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही.
त्याउलट UNSC अर्थात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी पाकिस्तानला कडक सवाल करून त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला. त्याचे झाले असे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला कडक शब्दांत फटकारण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत पाकिस्तानची इज्जतच काढली गेल्याची चर्चा आहे. सदस्य देशांनी त्यांना विचारले की पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात होता का? धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचा मुद्दाही पाकिस्तानसमोर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत उपस्थित करण्यात आला.

इस्लामाबादच्या बनावट दाव्यांना फटकारले!
पाकिस्तानच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) बंद दाराआड बैठक घेतली. यादरम्यान, परिषदेच्या सदस्यांनी इस्लामाबादचे 'बनावट' दावे स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांना कठोर प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि पाकिस्तानला विचारले की लष्कर-ए-तैयबा यात सहभागी असू शकते का? परिषदेने 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याचा व्यापक निषेध केला आणि जबाबदारी कोण घेणार आहे, यामागे नेमकं कोण आहे, असा कडक शब्दात सवाल त्यांनी उपस्थित केला.
पाकिस्तानला दिला कडक इशारा
सूत्रांनी पुढे सांगितले की, काही सदस्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारे लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि अणुयुद्धामुळे तणाव वाढण्याची शक्यता असल्याची चिंता अनेक सदस्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानचा प्रयत्न हा विषय आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा होता पण त्यातही तो अपयशी ठरला. भारतासोबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीने सोडवण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला.
पाकिस्तानचा कसा अपमान झाला
खरंतर, पाकिस्तान मोठ्या अपेक्षेने UNSC मध्ये गेला होता. त्याला आशा होती की UNSC चे सदस्य त्याच्या खोट्या कथेवर विश्वास ठेवतील, परंतु तसे झाले नाही. बंद दाराआड झालेल्या बैठकीत त्यांचे म्हणणे ऐकून सदस्य निवेदन जारी करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
त्यांची बाजू घेईल आणि भारतावर निशाणा साधतील. पण हे देखील घडले नाही. भारताच्या या हालचालीमुळे पाकिस्तानचा पराभव झाला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने कोणतेही निवेदन न जारी करून पाकिस्तानची पुन्हा एकदा इज्जतच काढली.












Click it and Unblock the Notifications