भारताला धोका वाढला? चीननंतर आता तुर्कीने पाठवली पाकिस्तानला हत्यारे, 'ती' 6 विमाने भरुन काय आणले?
भारत व चीनमध्ये सध्या संबंध चांगलेच ताणलेत. भारतासोबत युद्ध होण्याच्या स्थितीत सुरुवातीला चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रे पाठवली. आता तुर्कस्थाननेही पाकिस्तानला हत्यारांची विमाने पाठविल्याच्या बातम्या आल्या आहेत. तुर्कीतून शस्त्रे घेऊन जाणारी मालवाहू विमाने इस्लामाबादला पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जेव्हा तुर्कस्थानमध्ये भुकंप झाला तेव्हा त्यांना सगळ्यात पहिली मदत भारताने केली होती. मात्र तुर्की कृतघ्न निघाला.

तुर्कीतून सहा विमाने आली?
रविवारी शस्त्रास्त्रे घेऊन जाणारे तुर्की हवाई दलाचे C-130 हरक्यूलिस लष्करी वाहतूक विमान कराचीत दाखल झाले. काही सूत्रांनुसार तुर्कीहून किमान ६ सी-१३० मालवाहू लढाऊ विमाने इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. कराची व्यतिरिक्त इस्लामाबादमधील लष्करी तळावर ६ सी-१३० विमाने उतरल्याचे वृत्त आहे. एकट्याने भारताचा सामना करू शकत नसलेल्या पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा देत आहे. तुर्की आणि पाकिस्तान दोघांनीही शस्त्रास्त्रांच्या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. तथापि या शिपमेंटमध्ये कोणती शस्त्रे पाठवण्यात आली आहेत याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
कोणती शस्त्रास्त्रे पाठवली?
भारत हा पाकिस्तानवर हल्ला करेल, अशी शक्यता वाढली आहे. अशा काळात चीन व तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभे असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी चीनने पाकिस्तानला पीएल-१५ क्षेपणास्त्रे पाठवली होती. ती क्षेपणास्त्रे पाकिस्तानने त्यांच्या जेएफ-१७ लढाऊ विमानांमध्ये बसवली आहेत. आता तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पाठवल्याचे सांगितले जात आहे. तुर्कीने पाकिस्तानला पाठवलेल्या शस्त्रांमध्ये बायरक्तार टीबी२ ड्रोन, लहान शस्त्रे, स्मार्ट बॉम्ब आणि मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान आणि तुर्कीये यांच्यात शस्त्रास्त्रांबाबतचे करार आधीच झाले आहेत.
भारताला किती आहे धोका?
तुर्की आणि पाकिस्तानने इस्लामिक बंधुत्वाच्या आधारावर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर धोरणात्मक भागीदारीत करण्याचा निर्णय घेतला होता. तुर्कीने अनेक शस्त्रास्त्र करारांवर स्वाक्षरी केली आहे. विशेषतः भारताविरुद्ध पाकिस्तानला मदत करण्यासाठी हे दोन्ही देश एकत्र आले आहेत. तुर्की अनेकदा काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मदत करत असल्याचेही दिसले आहे. दुसरीकडे भारतासोबत वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी हवाई दलाने पेन्सी, स्कार्दू आणि स्वातसह प्रमुख हवाई तळ सक्रिय केले आहेत. सध्या या तळांवर F-16, J-10 आणि JF-17 लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. ज्यात लढाऊ हवाई गस्त (CAP) आधीच सुरू आहे. परंतु या सगळ्या प्रकाराचा भारताला जास्त धोका नसल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications