Sunita Williams : पृथ्वीवर येताच सुनीता विल्यमस् यांनी सँडवीच का खाल्लं? काय आहे कनेक्शन, जाणून घ्या
Sunita Williams : नासाच्या स्टार अंतराळवीर सुनीता विल्यम या अशा आहेत, ज्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त काळ अंतळारात राहण्याचा नवीन विक्रम नोंदवला. सुमारे नऊ महिने त्या अंतराळात होत्या. 18 मार्चला सुनीला विल्यमस् पृथ्वीवर परतल्या. यानंतर त्यांचे जगभरात कौतुकही झाले. सुनीता विल्यम या निडर आणि आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट अंतराळवीर ठरल्या, ज्यांनी न डगमगता आपली मोहीम यशस्वी केली.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स जेव्हा पृथ्वीवर परतल्या त्यानंतर त्या आपल्या कुटुंबीयांना भेटण्यास उत्सुक होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबाला भेट देत आपले औपचारिक कार्य पार पाडले. त्यानंतर त्यांनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला.

अवकाशातून पृथ्वीवर परतल्यानंतर विल्यम्स यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना त्यांच्या अंतराळ प्रवास आणि परतीच्या आठवणींवर प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. यामध्ये पृथ्वीवर परतल्यावर तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची होती? असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावेळी त्यांनी एक खास उत्तर दिले.
काय म्हणाल्या सुनीता विल्यम्स्?
पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, मला माझ्या पतीला आणि माझ्या पाळीव कुत्र्यांना मिठी मारायची होती.
"India is amazing." More from Suni in this clip: pic.twitter.com/M2ajvyAen9
— NASA (@NASA) March 31, 2025
नऊ महिन्यांनंतर सर्वात आधी सँडवीच का खाल्ले?
यावर सुनीता विल्यम्स म्हणाल्या, अन्न अशी गोष्ट आहे जी आपल्याला घराची आठवण करून देते. माझे वडील शाकाहारी होते, म्हणून मी घरी आल्यावर पहिली गोष्ट खाल्ली ती एक स्वादिष्ट ग्रील्ड चीज सँडविच होती. हे खाल्ल्याने मी घरी असल्याचे जाणवले.
अंतराळातून भारत कसा दिसतो?
पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने 'अंतराळातून भारत कसा दिसतो?' असा प्रश्न केला. यावर सुनीता विल्यम्स यांनी वर्णन केले की, "भारत आश्चर्यकारक आहे, फक्त आश्चर्यकारक आहे." पण, सुनीता येथेच थांबल्या नाहीतर एवढं बोलून त्यांनी ते दृश्य इतक्या रंजक आणि अनोख्या पद्धतीने वर्णन केले की ऐकणारेही त्यांच्या कल्पनेत हरवून जातात. त्यांनी विशेषतः हिमालयाच्या दृश्यांचा उल्लेख केला.
अंतराळातून कसा दिसतो हिमालय पर्वत
सुनीता म्हणाली, "आम्ही प्रत्येक वेळी हिमालय ओलांडून गेलो तेव्हा आम्हाला आश्चर्यकारक चित्रे मिळाली. जणू एक लाट खाली वाहत आहे आणि भारतात संपत आहे." भारत वेगवेगळ्या रंगात दिसला असे सुनीता म्हणाल्या. "मी हे आधी सांगितले आहे की जेव्हा टेक्टोनिक प्लेट्सची टक्कर झाली तेव्हा एक लाट तयार झाली, जी संपूर्ण भारतभर वाहते आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसते.
जेव्हा तुम्ही पूर्वेकडून गुजरात आणि मुंबईकडे जाता आणि तिथे मासेमारी करणाऱ्या बोटी पाहता, तेव्हा असे वाटते की कोणीतरी एक दिवा दाखवत आहे . त्या पुढे म्हणाल्या की, मोठ्या शहरांमधून मोठ्या प्रकाशाच्या जाळ्यात " शहरे, रात्री पाहणे अगदी प्रेक्षणीय आहे आणि दिवसा हिमालयाचे सौंदर्य आणखी वाढते." असेही त्या म्हणाल्या.












Click it and Unblock the Notifications