Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इराण-इस्रायल युद्धाचा भारताला मोठा फटका! पेट्रोल-डिझेलचे दर होऊ शकतात 'एवढे!' 'हे' आहे कारण वाचा

Strait of hormuz importance iran israel war impact on india : मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता केवळ क्षेपणास्त्रांपुरता मर्यादित राहिला नसून, तो जागतिक आर्थिक युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इराणने जगाची 'एनर्जी लाइफलाइन' मानली जाणारी 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद करण्याचा इशारा दिल्याने जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली आहे. केवळ ३३ किमी रुंदीचा हा समुद्री मार्ग जगाचे नशीब ठरवण्याची ताकद ठेवतो.

जर हा मार्ग बंद झाला, तर भारतासह संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था महागाईच्या सुनामीत वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गंभीर बाब म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीपर्यंत जाऊ शकतात, असे मीडिया रिपोर्ट सांगत आहेत.

Strait of hormuz importance

(छायाचित्र- AI)

काय आहे 'होर्मुजची सामुद्रधुनी'?

भौगोलिकदृष्ट्या ओमान आणि इराणच्या दरम्यान असलेला हा एक अरुंद समुद्री मार्ग आहे, जो पर्शियन खाडीला ओमानच्या खाडीशी आणि अरबी समुद्राशी जोडतो.

ऊर्जा धमनी

जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी सुमारे २० ते २५% व्यापार होर्मुजच्या सामुद्रधुनीच्या या मार्गावरून होतो हे विशेष हा मार्ग बंद झाल्यास मीडिया रिपोर्टनुसार, जगासह भारताला मोठा फटका बसू शकतो.

संकुचित मार्ग

या मार्गाची किमान रुंदी ३३ किमी असली, तरी जहाजांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित असलेली 'लेन' केवळ ३ किमी रुंद आहे. त्यामुळे या मार्गावर नियंत्रण मिळवणे म्हणजे जागतिक तेल बाजाराची नस दाबण्यासारखे आहे.

'हा' मार्ग बंद झाल्यास काय होईल?

सौदी अरेबिया, इराक, यूएई, कुवैत आणि कतर यांसारखे मोठे तेल निर्यातदार देश पूर्णपणे याच मार्गावर अवलंबून आहेत. दररोज सुमारे २० दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने येथून जातात.

१. किमतीत ऐतिहासिक वाढ

हा मार्ग बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात १२० ते १५० डॉलर्स प्रति बॅरलच्या पार जाऊ शकतात.

२. महागाईचा भडका

वाहतूक खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील.

३. आर्थिक मंदी

शेअर बाजार कोसळतील आणि जग एका मोठ्या आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकेल.

भारतासाठी सर्वात मोठा झटका का?

भारत आपल्या गरजेच्या ८०% तेल आयात करतो, ज्याचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो, भारतासारख्या खंडप्राय देशासाठी इंधनाची पुर्तता इतर देशावर अवलंबून आहे.

पेट्रोल-डिझेल होऊ शकते महाग : होर्मुजची सामुद्रधुनी बंद होण्याचा थेट अर्थ म्हणजे भारतात इंधन दर दुप्पट होणे.

रुपयाची घसरण होऊ शकते : आयातीचा खर्च वाढल्याने भारताची व्यापार तूट वाढेल आणि रुपयाचे मूल्य ऐतिहासिक निचांकी पातळीवर येईल.

मर्यादित साठाच राहू शकतो : भारताकडे 'स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह' असले तरी, ते केवळ काही आठवड्यांचाच पुरवठा करू शकतात.

हेही वाचा : विश्व युद्धाचे ढग.. इराणचे सुप्रीम लीडर 'खामेनेईंचा मृत्यू!'; ट्रम्प यांच्याकडून घोषणा, जगात खळबळ

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+