Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विश्व युद्धाचे ढग.. इराणचे सुप्रीम लीडर 'खामेनेईंचा मृत्यू!'; ट्रम्प यांच्याकडून घोषणा, जगात खळबळ

Iran supreme leader ayatollah ali khamenei death claims donald trump : "पश्चिम आशियातील युद्धाला आतापर्यंतचे सर्वात मोठे वळण मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करत जगाला धक्का दिला आहे. अमेरिकन-इस्रायली 'महाऑपरेशन'मध्ये इराणचे सर्वोच्च नेतृत्व संपल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असून, इराणच्या मौनाने या प्रकरणातील रहस्य अधिकच गडद केले आहे. इराणमध्ये नेमके काय घडले? खामेनेई खरोखरच मारले गेले का? पहा या विशेष वृत्तात!"

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (८६) यांचा अमेरिकन-इस्रायली संयुक्त मोहिमेत मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर जागतिक राजकारणात आणि विशेषतः पश्चिम आशियात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, इराण सरकारने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही हे विशेष. ट्रम्प यांच्या पोस्टनंतर तेहरानकडून एक पोस्ट आली आहे.

Iran supreme leader ayatollah ali khamenei death

डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा केली. त्यांनी खामेनेई यांचा उल्लेख "इतिहासातील सर्वात दुष्ट व्यक्तींपैकी एक" असा केला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, अमेरिकन गुप्तचर संस्था आणि इस्रायलने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत इराणचे अनेक वरिष्ठ नेते आणि रणनीतिक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

गूढ वाढवणारी 'ती' पोस्ट

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर काही मिनिटांतच खामेनेई यांच्या अधिकृत 'X' (ट्विटर) अकाऊंटवरून पर्शियन भाषेत एक गूढ पोस्ट करण्यात आली. यामध्ये "नामी हैदरच्या नावाने" असा उल्लेख होता. ही पोस्ट आधीच शेड्युल केलेली होती की कोणी मुद्दाम केली, याबाबत संभ्रम असून यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

संयुक्त राष्ट्र संघटना काय म्हणाली?

जागतिक पातळीवर युद्धाचे ढग दाटून आले असून आशिया आणि युरोप खंडात युद्धजन्य स्थिती आहे. या पार्श्वभुमीवर जग चिंतेत असून यासंदर्भात संयुक्त राष्ट्र (UN) उपाययोजना करत आहे. त्यातच युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत सांगितले की, ते सध्या या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी करू शकत नाहीत. त्यांनी सर्व पक्षांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

इराणची भूमिका काय?

इराण आणि इस्त्रायल हल्ल्यात अमेरिकेने उडी घेत खोमनोईच्या मृत्यूबाबत दावा केला तर त्यावर तेहरानने अद्याप मौन पाळले आहे. इराणच्या वरिष्ठ नेतृत्वाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+