आव्हानांना आव्हान देणे, माझ्या डीएनएमध्ये : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रशियात संबोधन
मॉस्को - भारताच्या विकासाने आज जग थक्क झाले आहे. आमच्याकडे जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप प्रणाली असून गरीबी ते हवामान बदलापर्यंत आव्हान देण्यास भारत सर्वात पुढे आहे.आव्हानांना आव्हान देणे माझ्या डीएनएमध्ये आहे. तिसऱ्या टर्ममध्ये मी तिप्पट ताकदीने काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी मॉस्कोमध्ये भारतीयांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध आणला आहे. मी तुमच्यासाठी 140 कोटी देशवासियांचे प्रेम आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.

भारत आणि रशियाचे अनोखे नाते
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि रशियाचे अनोखे नाते आहे. रशियाचे नाव ऐकताच भारतीयांच्या मनात येतो, आपला सुख-दु:खाचा साथीदार आहे. मागच्या दहा वर्षात देशातील विकास पाहून जग हैराण झाले आहे. भारतात परदेशी नागरीक येतात तेव्हा भारत बदलतोय हे ते म्हणत आहे. भारताचे नवनिर्माण त्यांना पाहायला मिळत आहे. भारताने जी- 20 चे यशस्वी आयोजन केले. हे पाहून जगातील लोक भारत बदलत असल्याचे सांगत आहेत.
सरकारच्या उद्दीष्टांत 3 या अंकाचा प्रभाव
पंतप्रधान म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही सरकारच्या काही उद्दीष्टांत तीन या अंकाचा प्रभाव आहे. तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती बनवणे , गरीबांना तीन कोटी घरं बनवणे, तीन कोटी लखपती दिदी बनवणे हे आमच्या सरकारचे उद्दीष्ट आहे.
मातृभुमी भारताबद्दल अभिमान
पंतप्रधान म्हणाले- भारत बदलत आहे कारण 140 कोटी भारतीय लोक भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प करीत आहे.भारतीय नागरीक देशाला विकसीत बनवण्यासाठी मेहनत घेत आहे. जगात जे भारतीय राहतात, ते भारताचा विकास पाहून आपल्या मातृभुमी भारताबद्दल अभिमान बाळगत आहात.
विदेशी मित्रांसोबत चर्चेवेळी भारताच्या विकासाचा पाढा वाचतात आणि हे विदेशी मित्र भारताचा विकास पाहून अचंबित होतात. हे 140 कोटी देशवासीयांनी करुन दाखवले.
भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने
पंतप्रधान म्हणाले- आम्ही आपल्या अर्थव्यवस्थेला कोविड संकटातून सुखरुप बाहेर काढले फक्त हेच नाही केले तर जगातील महत्वाच्या आर्थिक महाशक्तीच्या पंक्तित आणून ठेवले. देशाच्या प्रत्येक गरीबांना मोफत उपचार देत आहोत. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा योजना आणली आहे.
हार न मानणाऱ्यांचा विजय
पंतप्रधान मोदी म्हणाले -जो हार मानत नाही त्याचाच विजय होतो. भारताची युवाशक्ती भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी सामर्थ्यशील आहे.मागच्या दहा वर्षातील विकास फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी विकास होणार आहे. सेमी कंडक्टर, इलेक्ट्रीक व्हेईकल, ग्रीन हायड्रोजन, वर्ल्डक्लास इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत विकासावर आम्ही भर देत आहोत.












Click it and Unblock the Notifications