Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानचे पंतप्रधान नरमले; भारतासोबत सर्व विषयावर संवाद साधण्यास तयार, 'या' देशापुढे जोडले हात!

जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध बिघडलेले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले. तसेच पाकिस्तानातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली.

सलग सात दिवस युद्धजन्य परिस्थितीनंतर दोन्ही देशांनी सीजफायरचा निर्णय घेतला. परंतु, भारताने पाकिस्तानचे पाणी अडवलेले आहे.

एकत्रित अशी परिस्थिती असताना, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताशी बोलायचे आहे. त्यांना दहशतवादापासून पीओके या सर्व प्रश्नावर चर्चा करायची आहे, त्यासाठी त्यांनी नरमती भूमिका घेत एका देशाकडे विनंती केली, की त्यांनी आमच्यासाठी भारतासोबत संवाद साधावा. एकंदरीत आता पाकिस्तान नरमल्याचे दिसून येत आहे. त्याला आगामी काळात पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चांगलाच चिंतेत पडल्याचे पाहायला मिळत आहे.

pakistan

नेमकं काय घडलं!

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताशी बोलायचे आहे. दहशतवाद, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (POK) आणि व्यापाराचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अब्दुल अझीझ अल सौद यांना विनंती केली ते भारताशी बोलण्यास तयार आहेत.

पाकिस्तानी वृत्तवाहिनी ARY Newsनुसार, शाहबाज शरीफ यांनी मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवर चर्चा केली. या दरम्यान त्यांनी सौदी अरेबियाला सांगितले की, पाकिस्तान पीओके, सिंधू पाणी करार, व्यापार आणि दहशतवाद यावर भारताशी बोलण्यास तयार आहे. अर्थात भारताने जेव्हा नांग्या ठेचल्या तेव्हा पाकिस्तानला आता जाग आलेली असल्याचे यातून दिसून येत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कडक निर्बंध!

22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचे परतणे, अटारी वाघा सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत देणे थांबवणे, पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे.

सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करणे. भारताची भूमिका स्पष्ट आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद आणि पीओकेचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही.

पाकिस्तानने ओआयसीमधील 57 मुस्लिम देशांसमोर सिंधू पाणी कराराचा मुद्दा उपस्थित केला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवलेल्या बिलावल भुट्टो झरदारी यांच्या शिष्टमंडळानेही भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. तथापि, पाकिस्तानचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि कोणत्याही देशाने रस घेतला नाही.

65 वर्षांपूर्वी झाला होता सिंधू पाणी करार?

1960 मध्ये, साधारणत: 65 वर्षांपूर्वी, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपावर एक करार झाला होता, जो दोन्ही देशांसाठी वैध आहे. या करारानुसार, पश्चिमेकडील नद्यांच्या - सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे.

पूर्वेकडील नद्यांच्या - रावी, बियास आणि सतलजच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. अशा प्रकारे, भारताला 20 टक्के पाणी मिळते आणि पाकिस्तानला 80 टक्के पाणी मिळते. या अर्थाने, पाण्यासाठी त्याच्यावर अधिक अवलंबून राहणे आवश्यक आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने 6-7 मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली. भारताच्या कारवाईत नूर खानसारख्या पाकिस्तानच्या मोठ्या हवाई तळाचे बरेच नुकसान झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव खूप वाढला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+