Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PAKची आर्मी इतकी का झाली निर्दयी, त्यांच्याच देशातील मेंढपाळांना का संपवलं; त्यामागील सत्य काय?

Pakistan News, Pak Army Attack on Citizens : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात सुरक्षा दलांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिक लोकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली तर आर्मीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह केले आहेत. पाक सैन्याने आपल्याच देशातील नागरिकांवर हल्ला केल्याची चर्चा सद्या सुरू झाली.

सैन्याधिकारी म्हणाले 12 दशतवादी मारले गेलेत

दुसरीकडे, पाकिस्तानी सैन्याचा दावा आहे की, दहशतवादी अड्ड्यांवरील या हल्ल्यांमध्ये 12 दहशतवादी मारले गेले आहेत. शनिवारी सकाळी दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, मर्दान जिल्ह्यातील कटलांग या दुर्गम डोंगराळ भागात दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.

मारले गेलेले लोक हे मेंढपाळ असल्याचा स्थानिकांचा दावा

मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू 1122 चे प्रवक्ते मुहम्मद अब्बास म्हणाले की, जिल्हा उपायुक्तांच्या सूचनेनुसार त्यांनी सात पुरुष आणि दोन महिलांचे मृतदेह मर्दान-स्वात महामार्गावरील वैद्यकीय संकुलात हलवले.

त्यांनी सांगितले की, मृतांच्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. सर्व मृतदेह अत्यंत कुजलेले आहेत. स्थानिकांनी असा दावा केला की मारले गेलेले लोक स्वात जिल्ह्यातील मेंढपाळ होते.

मृतांचा दहशतवाद्यांशी काहीही संबंध नव्हता

या हल्ल्यांनंतर, स्थानिक लोकांनी मृतदेह महामार्गावर ठेवले. यावेळी त्यांच्याकडून निषेधही व्यक्त करण्यात आला. तथापि, चर्चेनंतर लोकांना पटवून देण्यात आले. सर्व मृतदेह डीएनए चाचणीसाठी रेस्क्यू सर्व्हिस 1122 कडे सोपवण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान 12 दहशतवादी मारले गेल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये अनेक कुख्यात दहशतवादी होते ज्यांच्या डोक्यावर मोठे बक्षीस होते.

या दहशतवाद्यांवर होते लाखोंचे इनाम

त्यांनी सांगितले की, ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी मोहसीन बाकिर याच्या डोक्यावर 70 लाख रुपये इनाम होते. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकाच्या अब्बासच्या डोक्यावर 50 लाखचे बक्षीस होते. सशस्त्र दहशतवाद्यांबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले अनेक दहशतवादी मारले गेले. एका निवेदनात असेही म्हटले आहे की दुर्दैवाने या कारवाईदरम्यान काही नागरिकही आगीत अडकले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

pakistan News

पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री म्हणाले नागरिकांचा मृत्यू निंदणीय

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर म्हणाले की, या कारवाईदरम्यान नागरिकांचा मृत्यू अत्यंत निंदनीय आणि दुःखद आहे. ही एक अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे सांगून त्यांनी असे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. सरकारने जखमींना वैद्यकीय मदत पुरवत असल्याचे म्हटले आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मदत आणि भरपाई देणे. परिसरात नागरिकांच्या उपस्थितीच्या सभोवतालच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. सुरक्षा दल सर्वोच्च दर्जा राखण्यासाठी वचनबद्ध आहेत. भविष्यात चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून नागरिकांची सुरक्षा राखताना धोके कमी करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.

मुख्यमंत्र्यांचे सल्लागार काय म्हणाले?

खैबर पख्तूनख्वा भागातील मुख्यमंत्र्यांचे माहिती सल्लागार बॅरिस्टर मुहम्मद अली सैफ यांनीही निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्यामुळे घडलेली ही एक दुःखद आणि दुर्दैवी घटना असल्याचे वर्णन केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+