Pahalgam:'सिंधूमध्ये पाणी वाहिल, नाहीतर त्यांचे रक्त'; पाक नेते बिलावल भुट्टो यांचा भारताला इशारा

Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट पसरली आहे. भारताने दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध एकामागून एक कठोर कारवाई सुरू केली आहे.

दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्यासह अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तान हादरला आहे. त्यानंतर पाकिस्तानातील नेते आता एकामागून एक भारताला धमकी देत आहेत. पाकमधील नेते बिलावल भुट्टो यांनी देखील भारताला धमकी दिली.

Pahalgam terror attack

काय म्हणाले बिलावल भुट्टो?

पाकिस्तानातील नेते बिलावल भुट्टो यांनी भारताला खुले आम धमकी दिली आहे. बिलावल म्हणाले- एकतर आता सिंधू नदीत पाणी खळखळून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यात वाहिल्याशिवाय राहणार नाही. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. त्यांच्या या विधानाने आता भारतातून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. बिलावल भुट्टो हे कायमच वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात. दुसरीकडे, भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आळा घालत नाही. तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही.

हे ही वाचा : Pahalgam Terror attack : पहलगाम हल्ला साधासुधा नाही - हा हिंदूंना धार्मिक लक्ष्य करण्याचा पॅटर्न!

कोण आहेत बिलावल भुट्टो?

बिलावल भुट्टो हे पाकिस्तानी राजकीय पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांची आई बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान होत्या. त्याच वेळी, बिलावल यांचे वडील आसिफ अली झरदारी सध्या पाकिस्तानचे राष्ट्रपती पद भूषवत आहेत. बिलावल सध्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीचे सदस्य आहेत. त्यांनी यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीपदही भूषवले आहे. बिलावल यांची आई बेनझीर भुट्टो यांची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली होती.

हे ही वाचा : 1971च्या PAK विरुद्धच्या युद्धात भारतीय सैन्यांनी कंडोमचा वापर का केला होता?, त्यावेळी काय घडलं होतं

पाक उपपंतप्रधानांची हल्ल्याची धमकी

भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानवर निर्बंध लावण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर निराशेच्या भरात पाकिस्तानने आता भारताला अणुबॉम्बची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी शुक्रवारी पाक संसदेत बोलताना पाकिस्तानकडे क्षेपणास्त्रे आणि अणुबॉम्ब आहेत. पाकिस्तानही या हल्ल्याला योग्य उत्तर देईल. पाकिस्तानविरुद्ध कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी भारताने हे समजून घेतले पाहिजे की पाकिस्तान एक अणुशक्तीवाले राष्ट्र आहे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा : Pahalgam Attack : पाकिस्तानशी संबंध संपले तर कोण-कोणत्या गोष्टी महागात पडू शकतात?, यादी पहा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+