Pahalgam Attack : पाकिस्तानशी संबंध संपले तर कोण-कोणत्या गोष्टी महागात पडू शकतात?, यादी पहा
Pahalgam Attack, India Vs Pakistan Relation : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी एक मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटक गटाला लक्ष्य केले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. सुमारे 28 पर्यटकांना ठार मारले आणि अनेक जण जखमी झाले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पूर्णपणे संपुष्टात येत आहेत.
त्याचा परिणाम आगामी काळात व्यापारावर देखील होणार आहे, चला तर जाणून घेऊया कोणकोणत्या वस्तू महाग होणार अन् त्याचा व्यापारावर कसा परिणाम होणार..!

भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणते ठोस निर्णय घेतले
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेतले. ज्यामध्ये भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यासोबतच, भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा देखील पूर्णपणे रद्द केला आहे. त्याच वेळी, सरकारने ज्या पाकिस्तानी नागरिकांना SVES व्हिसा आहे आणि सध्या भारतात आहेत त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, भारताने पाकिस्तानच्या अधिकृत x अकाउंटवर देखील बंदी घातली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पूर्णपणे संपुष्टात येत आहेत. सरकारच्या सर्व मोठ्या निर्णयांनंतर, त्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर दिसून येतो. भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत, पाकिस्तानशी संबंध संपुष्टात आल्यास भारतात अनेक गोष्टी महाग होऊ शकतात.
सुकामेव्याच्या किमती वाढण्याची शक्यता
भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सुकामेवा खरेदी करतो. भारतीय बाजारपेठेत सुकामेवा खूप लोकप्रिय आहेत. अशा परिस्थितीत, पाकिस्तानसोबतच्या व्यापारात बदल झाल्यामुळे, भारतातील सुक्या मेव्याच्या किमतीतही बदल होऊ शकतो. यामुळे, भारतात सुकामेवा मोठ्या प्रमाणात महाग होऊ शकतात.
सैंधव मीठ भारतात महाग होणार
याशिवाय, भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात सैंधव मीठ खरेदी करतो. भारतातील सैंधव मीठ पूर्णपणे पाकिस्तानातून येते. कारण पाकिस्तान हा जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे सैंधव मीठ सर्वात जास्त प्रमाणात आढळते. यामुळे, भारतात सैंधव मीठ सर्वात महाग होऊ शकते.
ऑफ्टिकल लेन्स महाग होण्याची शक्यता
भारतात चष्म्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स देखील पाकिस्तानमधून खरेदी केल्या जातात. भारतीय बाजारपेठेत येथे उत्पादित होणाऱ्या ऑप्टिक्सला मोठी मागणी आहे. आता, सरकारच्या मोठ्या निर्णयांनंतर आणि पाकिस्तानशी संबंध संपुष्टात आल्यानंतर, भारतात ऑप्टिकल लेन्स महाग होऊ शकतात.
सिमेंट, मुलतानी माती अन् चामड्यांच्या वस्तू महागणार
यासोबतच, भारत पाकिस्तानमधून फळे, सिमेंट, मुलतानी माती, कापूस, स्टील आणि चामड्याच्या वस्तूंची आयात करतो. सर्व उत्पादने पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात भारतात येतात. पण आता भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारात बदल होऊ शकतात. ज्यामुळे या सर्व गोष्टी महागही होऊ शकतात.












Click it and Unblock the Notifications