जेलमध्ये बंद असलेल्या इम्रान खान यांनी भारताला दिली धमकी; शरीफ कुटुंबाला म्हटले- तुम्ही भित्रे आहात
Imran Khan attack on Modi government over Pahalgam Attack : पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पहलगाम हल्ल्यावर विधान करत भारत सरकारला धमकी दिली आहे. तर दुसरीकडे त्यांनी त्यांच्या देशातील शरीफ सरकारचे देखील वाभाडे काढले, शरीफ सरकार भित्रे, घाबरट सरकार आहे, असाही आरोप त्यांनी केला.
काय म्हणाले इम्रान खान
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ला 'अत्यंत दुःखद आणि वेदनादायी' असल्याचे म्हटले. पाकिस्तानवर बोट दाखविण्याऐवजी भारताने जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.
त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांचे विधान जारी करण्यात आले आहे. निवेदनात इम्रान खान म्हणाले की, भारताने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. "पहलगाम घटनेतील जीवितहानी अत्यंत अस्वस्थ करणारी आणि दुःखद आहे. मी पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.

पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा तोच डाव!
इम्रान खान पुढे म्हणाले की, 'जेव्हा पुलवामा घटना घडली, तेव्हा आम्ही भारताला सर्वतोपरी मदत केली, परंतु भारत कोणतेही ठोस पुरावे देऊ शकला नाही. 2019 मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, पहलगाम हल्ल्यानंतर देखील भारत सरकार पुन्हा तेच करू पाहत आहे. मोदी सरकार आत्मपरीक्षण आणि चौकशी करण्याऐवजी सरकार पुन्हा तसाच काहीसा डाव आखत आहे, पुन्हा पुन्हा पाकिस्तानला दोषी ठरवत आहे.
“Loss of human life in Pahlgam incident is deeply disturbing and tragic. I extend my deepest condolences to the victims and their families.
— Imran Khan (@ImranKhanPTI) April 29, 2025
When the False Flag Palwama Operation incident happened, we offered to extend all-out cooperation to India but India failed to produce any…
'पाकिस्तानात प्रत्युत्तर देण्याची पूर्ण ताकद'
इम्रान खान म्हणाले की, माझ्या सरकारने २०१९ मध्ये संपूर्ण देशाला इशारा दिला होता. पाकिस्तानकडे कोणत्याही भारतीय हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांद्वारे आपल्याला देण्यात आलेल्या काश्मिरींच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचे महत्त्व नेहमीच अधोरेखित केले गेले आहे.
हे ही वाचा : मोदींनी सैन्याला फ्री हॅंड दिला, पाकिस्तान भेदरला; मंत्री तरारांची मध्यरात्री PC, म्हणाले-आम्ही सज्ज
आरएसएसवर काय साधला निशाणा
इम्राम खान म्हणाले की, भारतातील सरकार हे आरएसएस विचारसरणीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. परंतु, ते केवळ भारत किंवा राज्यासाठीच नाही तर ते संपूर्ण जगाला अडचणीचे ठरू शकते.
शांतता ही आमची प्राथमिकता
इम्रान खान यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, शांतता ही आमची प्राथमिकता आहे, परंतु त्याला तुम्ही भित्रेपणा ठरवू नये. भारताच्या कोणत्याही धाडसाला योग्य उत्तर देण्याची पूर्ण क्षमता पाकिस्तानकडे आहे.
हे ही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा, मास्टरमाइंड हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्याचा माजी पॅरा कमांडो
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications