मोदींनी सैन्याला फ्री हॅंड दिला, पाकिस्तान भेदरला; मंत्री तरारांची मध्यरात्री PC, म्हणाले-आम्ही सज्ज
Pakistan News, Pahalgam attack : भारत पहलगाम हल्ल्याचा खोटा बदल्याचा डाव आखून आमच्यावर पुढील 24 ते 36 तासांत लष्करी हल्ला करणार आहे. पण, आम्ही देखील त्याला प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री तरार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
विश्वासार्ह गुप्तचरांकडून ही माहिती आम्हाला मिळाल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजता त्यांनी प्रेस घेऊन यावर भाष्य केल्याने पाकिस्तान किती भेदरला आहे, याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत चालला आहे. भारताकडून काही ठोस निर्णय घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. काल सैन्यदलाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला अन् त्यांनी सैन्याला फ्री हॅंड दिल्याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर लागलीच पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी रात्री उशिरा दीड वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दावा केला की, आम्हाला विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली आहे, भारत पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो.
Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24-36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident.
— Attaullah Tarar (@TararAttaullah) April 29, 2025
Indian self assumed hubristic role of Judge, Jury and… pic.twitter.com/WVW6yhxTJ0
माहिती मंत्री तरार यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
पाकिस्तानचे माहिती मंत्री तरार यांनी सोशल मीडिया Xवरील एका पोस्टमध्ये लिहिले की, पाकिस्तानकडे विश्वासार्ह गुप्तचर माहिती आलेली आहे, भारत पहलगाम घटनेचा खोटा बदला करून पुढील 24 ते 36 तासांत लष्करी हल्ला करू शकतो. कोणत्याही आक्रमक कृतीला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा तरार यांनी दिला.
ते म्हणाले की पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी बनलेला आहे. या संकटाचे दुःख त्यांना खरोखर समजते. आपण जगात नेहमीच याचा निषेध केला आहे. सत्य उलघडण्यासाठी तटस्थ आयोगाकडून विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर पाकिस्तानने दिलेली आहे, असे तरार यांनी म्हटले.
पाकिस्तानी मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला परिस्थितीचे गांभीर्य ओळखावे, असे आवाहन केले. ते म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याचा आमचा संकल्प पुन्हा निर्धारित करतो आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले- आम्ही हाय अलर्टवर आहोत. दुसरीकडे, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यापूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते की, पाकिस्तान हाय अलर्टवर आहे. परंतु देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असल्यासच ते मिसाईल हल्ल्याचा वापर करण्यास देखील सज्ज आहेत.
भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली
22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी घटनेनंतर 24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, भारत पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. जगाच्या कानाकोपऱ्यात मारेकऱ्यांचा पाठलाग करेल.
यासोबतच भारताने पाकिस्तानविरुद्ध राजनैतिक बाबतीत नवीन डावपेच आखण्यास सुरुवात केली. सिंधू पाणी करार स्थगित केला आहे, अटारी-वाघा सीमा बंद केली आहे. त्या निर्णय़ानंतर मंगळवारी मोदींनी सैन्यदलाच्या सर्व प्रमुखांशी चर्चा केली.












Click it and Unblock the Notifications