म्यानमारला काही भूकंप सोडेना; विनाशकारी घटनेनंतरही भूकंपाचे 98 धक्के; मृतांचा आकडा डोकं फिरवणारा
Myanmar Earthquake Update News in Marathi : म्यानमार या देशाला सद्या भूकंपाच्या घटनेने वेढा घातलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून भूकंप काही म्यानमारचा पिछ्छा काही सोडत नाही. म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आतापर्यंत एकूण 98 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. देशाच्या हवामान आणि जलविज्ञान विभागाने मंगळवारी ही माहिती दिली. या भूकंपांची तीव्रता 2.8 ते 7.5 पर्यंत होती.
म्यानमारमध्ये झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपात मृतांची संख्या आता 3,600 वर पोहोचली आहे, तर पाच हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. १६० लोक अजूनही बेपत्ता आहेत. वृत्तसंस्था शिन्हुआ यांच्या माहितीनुसार जर विचार केला तर, राज्य प्रशासन परिषदेच्या माहिती पथकाने ही माहिती दिली.

आग्नेय आशियाई देशातील मंडाले प्रदेशात 28 मार्च रोजी एक शक्तिशाली भूकंप झाला, त्यानंतर काही मिनिटांतच 6.4 तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. हजारोंच्या संख्येने लोक इमारतींखाली दबले गेले. मृत्यूचा तांडव त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
भारताने 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू केले
भूकंपाने मंडाले सारखी अनेक शहरे उद्ध्वस्त केली. संयुक्त राष्ट्रांसह इतर आंतरराष्ट्रीय मदत संस्थांना मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी संघर्ष करावा लागला. तथापि, संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, भारत, युरोपियन युनियन, इतर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी म्यानमारमधील भूकंपग्रस्तांसाठी मदत आणि बचाव पथके पाठवली. अशावेळी भारताकडून देखील मदत करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेप्रमाणे 'ऑपरेशन ब्रह्मा' सुरू केले. या मोहिमेअंतर्गत, नवी दिल्लीने म्यानमारला अनेक टन वैद्यकीय साहित्य आणि मदत साहित्य पाठवले आहे.
मोदी म्हणाले- संकटकाळात भारत मदत करण्यास अग्रेसर
या संकटकाळात म्यानमारला मदत पुरवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला. 4 एप्रिल रोजी, पंतप्रधान मोदी यांनी बँकॉकमध्ये बिमस्टेक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष आणि म्यानमारचे पंतप्रधान, वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली. दोघांनीही म्यानमारमधील विनाशकारी भूकंपानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. वरिष्ठ जनरलने भारताच्या मदत प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की, संकटाच्या या काळात प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून भारत म्यानमारसोबत उभा आहे आणि गरज पडल्यास अधिक भौतिक मदत आणि संसाधने तैनात करण्यास तयार आहे.












Click it and Unblock the Notifications