Mea india response to donald trump : अमेरिकेच्या 500 टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचे सडेतोड उत्तर!
Mea india response to donald trump 500 percent tariff : "भारताचे परराष्ट्र आणि ऊर्जा धोरण हे केवळ १.४ अब्ज भारतीयांच्या हितासाठी आहे, ते कोणत्याही जागतिक महाशक्तीच्या दबावाखाली बदलणार नाही," अशा करारी शब्दांत भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ला प्रत्युत्तर दिले आहे.
रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५००% आयात शुल्क लावण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावित विधेयकानंतर दोन्ही देशांतील व्यापार युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने आपली 'नेशन फर्स्ट' भूमिका स्पष्ट करत ऊर्जा सुरक्षेसाठी स्वायत्त निर्णयांचा पुनरुच्चार केला आहे.

१.४ अब्ज भारतीयांचे हित सर्वोच्च: परराष्ट्र मंत्रालय
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका मांडली. ते म्हणाले की, "१.४ अब्ज भारतीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वस्त दरात ऊर्जा उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ऊर्जा सुरक्षा हा भारताचा सार्वभौम मुद्दा आहे. बाजारपेठेतील परिस्थिती आणि देशांतर्गत गरजांनुसार भारत रशियासह विविध स्रोतांकडून तेल आणि युरेनियमची खरेदी सुरूच ठेवेल."
मोदी आणि ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर चर्चा
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी भारत-अमेरिका व्यापार चर्चेबाबत केलेल्या विधानांचेही भारताने खंडन केले आहे. लुटनिक यांची विधाने चुकीची असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, दोन्ही देश गेल्या वर्षापासून संतुलित व्यापार करारासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, २०२५ या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल ८ वेळा फोनवरून संवाद झाला आहे, जे दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक आहे.
बांग्लादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता
याच पत्रकार परिषदेत भारताने बांग्लादेशातील परिस्थितीवरही भाष्य केले. तिथे अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले, घरे आणि व्यवसायांची होणारी जाळपोळ यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनांना 'खाजगी शत्रूत्व' म्हणून दुर्लक्षित करण्याच्या प्रवृत्तीवर भारताने टीका केली आहे.
भारताची मागणी काय?
बांग्लादेश प्रशासनाने कट्टरपंथीयांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून तिथल्या अल्पसंख्याकांमध्ये असलेली भीतीची भावना कमी होईल, अशी भारताची बांगलादेशमधील अल्पसंख्यांकाच्या मुद्द्यावर प्रमुख भुमिका आहे.
'नेशन फर्स्ट' हेच भारताचे धोरण
या संपूर्ण घडामोडींवरून भारताने जगाला हा संदेश दिला आहे की, भारताचे परराष्ट्र धोरण हे 'नेशन फर्स्ट' (राष्ट्र प्रथम) या भावनेने प्रेरित आहे. रशियासोबतचा व्यापार असो किंवा तैवान सामुद्रधुनीतील वाढता लष्करी तणाव, भारत कोणत्याही महाशक्तीच्या आर्थिक किंवा राजकीय दबावापुढे झुकणार नाही.












Click it and Unblock the Notifications