नागपूर RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड Saifullah Khalidची पाकमध्ये हत्या, भारताचा शत्रू ठार!
Lashkar e Taiba Terrorist Abu Saifullah Killed : लष्कर-ए-तैयबा आणि जमातचा दहशतवादी राजुल्ला निजामानी उर्फ अबू सैफुल्लाची पाकिस्तानात हत्या झाली आहे. पाकिस्तानातील सिंधमधील मतली फलकारा चौकाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाहवर गोळ्या घालून त्याला संपवले.
दरम्यान, या घटनेमुळे मात्र भारताचा आणखी एक दुश्मन मारला गेला आहे. 2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून सैफुल्लाची ओळख होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफुल्लाह नेपाळमध्ये लष्करच्या मॉड्यूलवर काम करत होता. तो नेपाळमध्ये विनोद कुमार या नावाने काम करत होता. त्यांचे लग्न नगमा बानू या नेपाळी महिलेशी झाले होते. सैफुल्लाह भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करणे आणि आर्थिक मदत गोळा करणे ही कामे करत असे. सैफुल्ला हा लष्कर ए तैयबाचा ऑपरेशनल कमांडर आझम चीमा उर्फ बाबाजी याचा खास सहकाही मानला जात असे.

नागपूर व सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्याचा होता मास्टरमाइंड
काही माध्यमांच्या अहवालानुसार, 2006 मध्ये नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सैफुल्लाचा सहभाग होता. त्याचबरोबर 2008 मध्ये उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणि 2005 मध्ये आयआयएससी बंगळुरूवरील हल्ल्याच्या कटाचा तो मास्टरमाइंड देखील होता. भारताचा प्रमुख शत्रू असलेला सैफुल्लाचा खात्मा झाल्याने ही भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगली बातमी आहे.
लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू कतालही मारला गेला
यापूर्वी, लष्कर-ए-तैयबाचा (LET) मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कतालची 15 मार्चच्या रात्री पाकिस्तानमध्ये त्याची हत्या झाली होती. पंजाब राज्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली होती. अबू कताल हा 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा अतिशय जवळचा मानला जात असे. कताल हा लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख सदस्य होता आणि जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ल्यांचा कट रचल्याबद्दल ओळखला जात होता. गेल्या वर्षी 9 जून रोजी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या हल्ल्यातही अबू कतालचा सहभाग असल्याचे सांगितले गेले होते.
कोण होता सैफुल्ला खालिद
सैफुद्दीन खालिद दोन दशकांहून अधिक काळ भारतविरोधी कारवाया करत होता. तो लष्कर-ए-तैयबाशी संबंधित होता आणि त्याचे नाव आणि ओळख लपवून नेपाळमध्ये राहत होता. त्याने नेपाळमध्ये आपले नाव बदलून विनोद ठेवले होते आणि तेथून तो दहशतवादी नेटवर्कसाठी काम करत असे. जेव्हा भारतीय गुप्तचर संस्थांना त्याच्या नेपाळमध्ये लपल्याची माहिती मिळाली तेव्हा तो आपला जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानातील सिंध प्रांतात लपला होता. दरम्यान, त्याची हत्या झाल्याने भारताचा एक मोठा शत्रू मारला गेला एवढं मात्र खरं आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे








Click it and Unblock the Notifications