Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

44 देशांमध्ये असणार मुस्लिम राजवट ! बाबा वांगाची आणखी एक भविष्यवाणी खरी ठरेल का?

जपानमधील प्रसिध्द भविष्यवाणी करणारी महिला रियो तात्सुकी यांनी नुकतीच केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाबा वांगाने आता अशी भविष्यवाणी केली आहे की, 2043-44 पर्यंत यूरोपमधील 44 देश इस्लामिक शासनाखाली येतील, अशी भविष्यवाणी केली आहे.

ही भविष्यवाणी 18 वर्षांनंतर होणाऱ्या या बदलांचा दावा करत आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर या भविष्यवाणीची चर्चा सुरु झाली आहे. बाबा वांगा यांनी केलेल्या आतापर्यंत बहूतांश अनेक भविष्यवाण्या सत्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या दाव्याला लोक गांभीर्याने घेतात.

japanese baba vanga predictions

2043-44 पर्यंत यूरोपमधील 44 देशात इस्लामिक शासन ?

बाबा वांगा यांनी 2043 पर्यंत यूरोपमध्ये एक मोठा बदल घडेल, असे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, 2025 पासून यूरोपमध्ये एक संघर्ष सुरू होईल, जो 2043 पर्यंत इस्लामिक शासन स्थापित करेल. या दाव्यानुसार यूरोपमधील 44 देशांमध्ये इस्लामिक प्रभाव वाढेल आणि ईसाई धर्माचा प्रभाव कमी होईल. ही भविष्यवाणी 18 वर्षांने पूर्ण होण्याची शक्यता आहे, जी आता जागतिक चर्चेचा विषय बनली आहे.

2043 पर्यंत इस्लामिक शासनाची स्थापना होईल, अशी भविष्यवाणीमुळे यूरोपमधील धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती स्थलांतर, युद्ध किंवा आर्थिक संकटांमुळे उद्भवू शकते, ज्यामुळे इस्लामिक प्रभाव वाढेल. ईसाई धर्माचा प्रभाव कमी होऊन इस्लाम हा प्रमुख धर्म बनू शकतो, जे यूरोपच्या ऐतिहासिक ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण करेल.

काही विश्लेषकांचे मत आहे की, ही भविष्यवाणी लोकसंख्येच्या बदलांशी संबंधित असू शकते. यूरोपमध्ये सध्या स्थलांतरित लोकांची संख्या वाढत आहे, ज्यामध्ये मुस्लिम समाजाचा समावेश आहे. जर ही प्रवृत्ती अशीच चालू राहिली, तर 2043 पर्यंत धार्मिक संतुलनात बदल होण्याची शक्यता आहे. परंतु, हे केवळ तर्क आहे आणि यासाठी ठोस पुरावा नाही.

जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याचा दावा

बाबा वांगाने दोन दिवसापुर्वींच दोन मोठ्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्या या भविष्यवाणीमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. बाबा वांगाने भविष्यवाणी केली आहे की, पहिल्या भविष्यवाणीत असा दावा करण्यात आला आहे की, पुढील तीन महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात महाप्रलयासारखा महासुनामी येण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच पुढील हजारो वर्षांत चंद्र पूर्णपणे नष्ट होईल आणि ही घटना इतकी विनाशकारी असेल की पृथ्वीवरील जीवनाचे संतुलन बिघडेल, असं म्हटलं आहे.

दुस-या भविष्यवाणीत म्हटंल आहे की, 3000 ते 5000 या काळात एक प्रचंड उल्कापिंड चंद्रावर आदळेल. या धडकीनंतर, चंद्र धुळीच्या ढगात विखुरला जाईल. जर पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह नाहीसा झाला तर त्याचे परिणाम केवळ आकाशातच जाणवणार नाहीत तर प्रत्येक महासागरावर, प्रत्येक ऋतूवर आणि प्रत्येक सजीव प्राण्यांच्या दैनंदिन दिनचर्येवरही जाणवतील. बाबा वेंगाने अशी भविष्यवाणी केली होती की, चंद्राच्या या विनाशामुळे मानवतेसाठी संकटांचा काळ सुरू होईल, जो 5079 मध्ये पृथ्वीच्या अंतापर्यंत पोहोचेल, असं म्हटलं आहे

मागील भविष्यवाण्यांचा इतिहास

बाबा वांगाने 9/11 हल्ले, कोविड-19 महामारी आणि राजकुमारी डायनाचे निधन यांसारख्या घटनांची भविष्यवाणी केली होती, ज्यांचे काही प्रमाणात सत्यत् सिद्ध झाले होते. तितक्याचप्रमाणे रियो तात्सुकीने 1995 च्या कोबे भूकंप आणि 2011 च्या तोहोकू सुनामीच्या भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या खऱ्या ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नवीन भविष्यवाणी लोकांचा विश्वास वाढला आहे, परंतु तज्ज्ञांनी यांना केवळ संभाव्यता म्हणूनच पाहण्याचा सल्ला दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+