Israel-Iran War: इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळा, भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाकडून सुचना
Israel-Iran War: इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याने दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावावर भारत लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या नागरिकांना इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाकडून दिला आहे. तसेच इराणमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान इराणने मंगळवारी इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनल्यानंतर भारताने हे निर्देश दिले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, आम्ही या प्रदेशातील सुरक्षा स्थितीतीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. भारतीय नागरिकांनी इराणमधील अनावश्यक प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे. सध्या इराणमध्ये राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याची आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इराणचा इस्रायलवर हल्ला
इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याने दोन्ही देशांमधील संघर्ष वाढला आहे. इस्रायलने अनेक क्षेपणास्त्रे रोखून नष्ट केल्याचा दावा केला असला तरी, तेल अवीव आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी तेहरानला 'गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल' असा इशारा दिला होता. त्यामुळे मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा धोका वाढला आहे.
MEA says, "We are closely monitoring the recent escalation in security situation in the region. Indian nationals are advised to avoid all non-essential travel to Iran. Those currently residing in Iran are requested to remain vigilant and stay in contact with the Indian Embassy in… pic.twitter.com/uh1wZb4e4v
— ANI (@ANI) October 2, 2024
तणावाच्या काळात भारतीयांना सल्ला
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशात सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने मंगळवारी इस्रायलमधील भारतीय नागरिकांसाठी एक सूचना जारी केली. अधिकाऱ्यांनी भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितलं आहे.












Click it and Unblock the Notifications