पंतप्रधान सोडा..आधी भारताच्या राजदुतांनीच ट्रम्प यांना ठणकावले! 4 मुद्यात जाणून घ्या, काय म्हणाले ते
India's Russian Ambassador Vinay Kumar's blunt reply to US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून डोनाल्ड ट्रम्प हे जगाला आणि भारताला सतत धमक्या देत आहे या ठमक्यांना जुमानता भारतानेही आपला पवित्र कायम राखला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता.. हे कमीच म्हणून भारताचे रशियातील राजदूत विनय कुमार यांनी थेट अमेरिकेला ठणकावले आहे. याबाबत वनइंडिया हिंदीने वृत्त दिले आहे.
अमेरिकी टॅरीफच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, अशा स्थितीत भारताकडून याला सडेतोड उत्तर दिले जात आहे, रशियासोबत भारताचा व्यवहार आणि व्यापार सुरूच राहील असे यापूर्वीच भारताने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता भारताने रशियासोबत तेल व्यापारासंदर्भातील आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे.

रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेने एकीकडे भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लावले आहे, आता ते 50 टक्के इतके झाले आहे. 27 ऑगस्ट पासून अतिरिक्त शुल्काची अंमलबजावणी अमेरिका करणार आहे. या दरम्यान रशियातील भारताचे राजदूत विनायक कुमार यांनी अमेरिकेला स्पष्ट शब्दात आपली भूमिका सांगितली आहे.
1. राष्ट्रीय हित, लोकांची ऊर्जा गरज महत्वाची
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर 25% अतिरिक्त शुल्क लावले होते, जे आता 50% पर्यंत वाढले आहे. हे नवीन शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. या संदर्भात, रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी अमेरिकेला भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, भारत आपल्या राष्ट्रीय हितासाठी आणि 140 कोटी लोकांच्या ऊर्जा सुरक्षेची गरज भागवण्यासाठी कटिबद्ध आहे.
2. जिथे तेल स्वस्त, तिथूनच खरेदी!
विनय कुमार यांनी अमेरिकेने लादलेल्या या शुल्कांना 'अयोग्य आणि अव्यवहारिक' म्हटले. ते म्हणाले की, भारत व्यापारी तत्त्वांवर आधारित निर्णय घेतो आणि सर्वात कमी खर्चिक पर्याय निवडतो. भारताचे धोरण स्पष्ट आहे; जिथे तेल स्वस्त मिळेल, तिथूनच ते खरेदी केले जाईल.
3. दबावापुढे झुकणार नाही...
भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले की, भारत आपल्या राष्ट्रीय हित आणि ऊर्जा गरजांसाठी कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही. भारताची ही भूमिका जागतिक तेल बाजाराला स्थिर ठेवण्यासाठीही मदत करत आहे. विनय कुमार म्हणाले की, अनेक युरोपियन देश आणि खुद्द अमेरिकाही रशियासोबत व्यापार करत आहेत. त्यामुळे भारताच्या व्यावसायिक निर्णयांवर अमेरिकेच्या शुल्काचा कोणताही परिणाम होणार नाही.
4. टॅरीफ व्यापारावर प्रभाव टाकू शकत नाही
भारताने रशियासोबत तेल आयातीसाठी आपापल्या राष्ट्रीय चलनांमध्ये स्थिर व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा व्यवहारांना कोणताही धोका नाही. यातून भारताने हे स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि त्यांचे टॅरीफ भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि व्यावसायिक निर्णयांवर प्रभाव टाकू शकत नाही. भारताने आपल्या 140 कोटी जनतेच्या गरजांना नेहमीच प्राधान्य दिले आहे आणि तेच धोरण कायम राहील.












Click it and Unblock the Notifications