Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत भारताने पाकिस्तानची काढली लायकी! पाकड्यांना कुणी धो-धो धुतलं जाणून घ्या

India slams Pakistan at UN Security Council : पाकिस्तान दहशतवादाला पोसतो ही गोष्ट जगाला भारताने वारंवार पुराव्यासह दाखवली आहे. पहलगाम हल्ल्यातही पाकिस्तानचे हात बरबटल्याची माहिती आहे, अशातच पाकीस्तान त्याच्या ढोंगीपणावरुन मागे हटत नाही. एकीकडे दहशतवादाला पोसायचे अन् दुसरीकडे भारताविरोधातच आरडा-ओरड करायची ही निती मागील काही दशकांपासून पाकड्यांनी अवलंबवली आहे.

India slams Pakistan at UN Security Council

जरी कितीही घसा ओरडून पाकिस्तानी सरकार जगाला सांगत असले तरीही पाकिस्तानच्या पापाचे किती घडे भरले हे कुणी सांगण्याची गरज नाही, असाच प्रत्यय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आला. भारताचे संयुक्त राष्ट्र परिषदेतील स्थायी प्रतिनिधी पी. हरिश यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या पोकळ आरोपाची हवाही काढली.

दहशतवादी आणि नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही

भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर टीका केलीभारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर टीका केली आणि सीमापार दहशतवादाशी संबंध असूनही नागरिकांच्या संरक्षणावर भाष्य केल्याबद्दल ढोंगीपणाचा आरोप केला. यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पी. हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एक निवेदन दिले.

Take a Poll

पहिलाच दणका

भारताने नागरी संरक्षणावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या चर्चेत पाकिस्तानच्या उपस्थितीबद्दच प्रश्न उपस्थित केले आणि भारताने याचा निषेध केला. राजदूत पी. हरीश यांनी पाकिस्तानवर दशकांपासून दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. पहलगाम हल्ल्याचा संदर्भ त्यांच्या निवेदनात होता यासह अलिकडच्या काळात नागरिकांचा बळी घेणाऱ्या आणि प्रार्थनास्थळांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला.

नेमके काय म्हणाले पी. हरिश?

भारताने जागतिक समुदायाला दहशतवादाविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी, पी. हरिश यांनी आपले म्हणणे जोरकसपणे मांडले. भारताची बाजू मांडताना ते म्हणाले, पाकिस्तान हा असा देश आहे जो नागरिक आणि दहशतवादी यांच्यात फरक करत नाही. नागरिकांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी केलेले भाषण प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान आहे असे ते म्हणाले. राजदूत हरीश यांनी 'सशस्त्र संघर्षात नागरिकांचे संरक्षण' या विषयावर हे भाष्य केले. राजदूत हरीश म्हणाले, "पाकिस्तानच्या प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर केलेल्या निराधार आरोपांना उत्तर देण्याची वेळ माझ्यावर आली आहे."

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान केला

भारताने शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानवर टीका केली आणि संघर्षग्रस्त क्षेत्रातील नागरिकांच्या संरक्षणावरील चर्चेत त्याचा सहभाग "आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान" असल्याचे म्हटले. प्रथम, भारताने आपल्या सीमेपलीकडे दशकांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले अनुभवले आहेत,"असे राजदूत पी. हरीश म्हणाले.
यासह त्यांनी पाकिस्तानच्या ढोंगीपणाचा निषेध केला.

पाकिस्तानची पात्रता काय, कसला अधिकार?

ते म्हणाले की,दहशतवादी आणि नागरिकांमध्ये फरक न करणाऱ्यांना नागरी संरक्षणाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही तसेच पाकिस्तानी सैन्याने या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय सीमावर्ती गावांवर जाणूनबुजून गोळीबार केला, ज्यामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आणि प्रार्थनास्थळांना जाणूनबुजून लक्ष्य केले हे देखील अधोरेखित केले.

पाकिस्तानी सैन्याने या महिन्याच्या सुरुवातीला जाणूनबुजून भारतीय सीमावर्ती गावांना लक्ष्य केले हेही ते म्हणाले. "या हल्ल्यात 20 हून अधिक नागरिक मारले गेले आणि 80 हून अधिक जखमी झाले. गुरुद्वारा, मंदिरे आणि कॉन्व्हेंटसह प्रार्थनास्थळांना तसेच वैद्यकीय सुविधांना जाणूनबुजून पाकिस्तानी सैनिकांनी लक्ष्य केले, एकीकडे नागरी वसाहत आणि धार्मिक स्थळावर हल्ले करायचे अन् दुसरीकडे संयुक्तराष्ट्र सुरक्षा परिषदेसारख्या संस्थेत उपदेशाचे डोस पाजायचे हे ढोंगीपणाच आहे" असे ते म्हणाले.

26/11 ते पहलगाम - नागरीकांवर हल्ला

पी. हरिश यांनी पाकिस्तानच्या करारनाम्याची यावेळी चिरफाड केली. 26/11 ते पहलगाम हल्ल्यापर्यंत त्यांनी पाकिस्तानच्या पापाचा पाढाच वाचला. पहलगाम हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष केले गेले. म्हणजेच पाकिस्तानी दहशतवादाचे बळी प्रामुख्याने नागरिक आहेत, कारण त्यांचा उद्देश आपल्या समृद्धी, प्रगती आणि मनोबलावर हल्ला करणे आहे. अशा राष्ट्राने नागरिकांच्या संरक्षणावरील चर्चेत भाग घेणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान आहे," याचा पुनरुच्चारही पी. हरीश यांनी केला.

दहशतवाद्यांना श्रद्धांजलीवर वक्तव्य

भारताने सिंदूर ऑपरेशनदरम्यान लक्ष केलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील अधिकारी, वरिष्ठ पोलिस श्रद्धांजली वाहताना दिसले. अंत्यसंस्कारात सामिल झाले होते, म्हणजेच नागरिक आणि दहशतवादी यांच्यात पाकिस्तान काहीही फरक करत नाही. नागरिकांच्या संरक्षणाविषयी बोलण्याची पाकिस्तानकडे पात्रता नाही असेही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+