दहशवादाविरोधात लढा..आम्ही तुमच्यासोबत! अमेरिकेची डंके की चोटपर भारताला साथ; पाकिस्तान पडला एकटा!
India Pakistan War Trump administration announces support for India against terrorism : काश्मीर खोऱ्यात वाढत्या दहशतवादी कारवाया आणि पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर आता भारताच्या बाजूने अनेक देश उभे राहत आहेत. ट्रम्प प्रशासनाने आजच यासंदर्भात एक घोषणा केली असून दहशतवादाविरोधात भारताने उभे राहावे, दहशतवादाविरोधात ज्या गोष्टी आवश्यक असेल त्याची पुर्तता अमेरिका करेल असेही ट्रम्प प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्यात जवळपास 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भारताने कडक धोरण अवलंबवले आहे. दरम्यान काल परवा यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेसोबत तसेच वायू आणि नौदलासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक पर पडली. अशातच आता अमेरिकेनेही दहशतवादाविरोधात भारतासोबत आहोत अशी घोषणा केली आहे. त्यामुळे भारताची बाजू भक्कम झाली आहे.
“We will help India fight terrorism,” says U.S. Speaker Mike Johnson#KashmirAttack #IndiaUSRelations #PahalgamAttack #MikeJohnson #FightTerrorism #USSupportsIndia pic.twitter.com/9o4ytupdl9
— Business Today (@business_today) May 6, 2025
काय म्हणाले अमेरिकी संसद स्पीकर माईक जाॅनसन?
प्राप्ता माहितीनुसार यासंदर्भात आजतकने वृत्त दिले आहे. अमेरिकी संसद स्पीकर माईक जाॅनसन यांनी म्हटले की, भारताला कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाविरुद्ध उभे राहावे लागेल. आम्ही भारतीयांचा साथ देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु. यासह दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला आवश्यक साधनसामग्री देऊ असेही त्यांनी म्हटले आहे.
दहशतवादाचा धोका आम्ही जानतो - ट्रम्प प्रशासन
संसद स्पीकर माईक जाॅनसन यांनी हेही म्हटले की, नाते असेच रुजत असते आणि वृद्धींगत होत असते आणि आम्ही नात्यांचे महत्व समजतो तसेच दहशतवादाचा धोकाही आम्ही जाणतो. कॅपीटल हाॅलमध्ये बोलताना जाॅनसन यांनी म्हटले की, भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही पुर्ण सहवेदनेसोबत त्यांच्यासोबत आहोत. आमच्या सहयोगी देशासोबत आम्ही उभे राहू इच्छितो. आम्हाला वाटते की, भारत अनेक दृष्टीकोनातून आमचा महत्वपूर्ण भागीदार देश आहे. दोन्ही देशांसोबत लवकरच आता व्यापारविषयक गोष्टी घडणार असल्याचेही ते म्हणाले.
भारत-पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण
भारतातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास सव्वीस लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतासोबतचे संबंधही तावपूर्ण आहेत, अशातच आता दोन्ही देश संघर्षाच्या तयारीत आहेत. एकीकडे भारताने पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतीय विमानांना आपल्या हद्दीतून प्रवास करण्याच मनाई केली आहे, दरम्यान भारताने अरबी समुद्रात युद्धनौकांची गस्त वाढवत लढाऊ विमानांचा सराव आणि माॅकड्रीलची तयारीही पुर्ण केली आहे.












Click it and Unblock the Notifications