Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Earth day 2025: पृथ्वी कधी नष्ट होईल? NASA च्या उत्तराने टेन्शन वाढले; पृथ्वीचा शेवटचा दिवस सांगितला

सगळे जग वसुंधरा दिवस साजरा करत आहे. पृथ्वीतलावरचे सगळेच सजीव एक दिवस ही वसुंधरा सोडून जाणार आहेत. मात्र ही वसुंधराही चिरकाल टिकणारी नाही, ही टेन्शन वाढविणारी बातमी आहे. नासा आणि जपानच्या तोहो विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या एका संशोधनाने जगाला धक्का दिला आहे. या संशोधनातून पृथ्वीवरील जीवनाच्या अंताची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

when will the earth be destroye

कधी होईल पृथ्वीचा अंत?

सुपर कॉम्प्युटर आणि गणितीय मॉडेल्सच्या मदतीने शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर किती काळ जीवन शक्य आहे, हे शोधून काढले आहे. संशोधनात असे म्हटले आहे की पुढील एक अब्ज वर्षे पृथ्वीवर जीवसृष्टी टिकू शकते. परंतु १,०००,००२,०२१ पर्यंत सर्व काही नष्ट होईल. याचा अर्थ असा की, असा दिवस येईल जेव्हा पृथ्वीवरून सर्व प्रकारचे जीवसृष्टी नाहीशी होईल.

पृथ्वीच्या विनाशाचे कारण काय?

पृथ्वी नष्ट होणार या चर्चेवर अनेक शास्त्रज्ञांचे एकमत आहे. मात्र पृथ्वी का नष्ट होईल? याचे उत्तरही तेवढेच महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीच्या अंतासाठी सूर्य जबाबदार असेल. सूर्याचा आकार जसजसा वाढत जाईल, तसतशी त्याची औष्णिक ऊर्जा देखील वाढत जाईल. याचा परिणाम पृथ्वीसह इतर ग्रहांवर होईल. पृथ्वीवरील तापमान इतके वाढेल की, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल. ऑक्सिजन कमी झाल्याने मानवांसह कोणत्याही सजीवांना जगणे कठीण होईल आणि अंत होईल.

अजून काय कारण?

मानवी क्रियाकलापांमुळे हवामान बदल अतिशय धोकादायक दिशेने जात असल्याचेही संशोधनातून समोर आले आहे. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि जंगलतोड यासारख्या कारणांमुळे पृथ्वी आधीच कमकुवत होत चालली आहे. हे सर्व बदल पृथ्वीला हळूहळू विनाशाकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या अंताला फक्त सूर्यच नाही तर अमर्याद जंगलतोड हेही एक कारण आहे.

विनाश थांबवता येईल का?

पृथ्वीच्या अंताची तारीख सांगितली गेली असली तरी, एक सुखद भविष्यवाणीही शास्त्रज्ञांनी केली आहे. तंत्रज्ञानातील विकासामुळे हे बदल नियंत्रित केले जाऊ शकतात, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मानवांना कृत्रिम वातावरणात जिवंत ठेवता येते, असे आढळले आहे. मंगळासारख्या ग्रहांवर जीवनाची शक्यता शोधण्यासाठी प्रयत्न तीव्र केले जात आहेत. या संशोधनानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, जर मानवांनी आताच आपल्या सवयी बदलल्या नाहीत तर त्याचे परिणाम भावी पिढ्यांना भोगावे लागतील. पण जर आपण आजपासूनच पर्यावरणाचे रक्षण करायला सुरुवात केली तर हा विनाश टाळता येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+