ट्रम्प यांचा नवीन दावा, भारत पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाले असते! मी युद्ध मिटवलं! हे दिलं मोठ्ठं कारण
Donald Trump New claims : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा दावा केला आहे. भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवलं असं आधीच त्यांनी परस्पर घोषित करुन टाकलं होतं, त्यावर भारताने हा दावा खोडून काढला होता आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फोन संभाषणादरम्यान त्यांना पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्ध थांबवलं असं स्पष्ट म्हटलं होतं. त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा मोठा दावा केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा यावेळी मोठा दावा आहे. भारत पाकिस्तान युद्ध तर आम्ही थांबवलंच. पण ज्यावेळी दोन्ही राष्ट्रांत युद्ध सुरु होते तेव्हा ते थांबवले नसते तर एका आठवड्यात अणूयुद्ध झाले असते पण आम्ही हे होऊ दिले नाही.आम्ही त्या दोघांना युद्धापासून थांबवलं असा दावा त्यांचा आहे. एनआयने यासंदर्भात एक्सवर वृत्त दिलं आहे.
#WATCH | US President Donald Trump says, "We have been very successful in settling wars. You have India, Pakistan...India and Pakistan would have been a nuclear war within another week, the way that was going. That was going very badly. We did that through trade. I said, we're… pic.twitter.com/GPDA6ObK0B
— ANI (@ANI) July 15, 2025
नेमके काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
एनआयच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आम्ही युद्धे मिटवण्यात खूप यशस्वी झालो आहोत. तुमच्याकडे भारत, पाकिस्तान आहे... भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एका आठवड्यात अणुयुद्ध झाले असते, जसे ते चालू होते. ते खूप वाईट चालले होते. आम्ही ते व्यापाराच्या माध्यमातून केले. मी म्हणालो, जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट मिटवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल बोलणार नाही. आणि त्यांनी ते केले..."
भारत मध्यस्ती स्वीकारत नाही - पीएम मोदी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कधीही भारत-अमेरिका व्यापार करारावर किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा कोणताही प्रस्ताव मांडला नाही. लष्करी कारवाई थांबवण्याची चर्चा भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट दोन्ही सशस्त्र दलांमधील विद्यमान संपर्क माध्यमांद्वारे झाली आणि ती पाकिस्तानच्या विनंतीवरून सुरू झाली होती. भारत मध्यस्थी स्वीकारत नाही आणि कधीही स्वीकारणार नाही. या विषयावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे, असं पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ठामपणे सांगितले होतं. पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी संभाषणात ही बाब पीएम मोदींनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितली होती, यासंदर्भात परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली होती.
ट्रम्प नव्हे यामुळे युद्ध कारवाई थांबवली
सिंदूर ऑपरेशनदरम्यान, 9-10 मे च्या रात्री भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले. त्यांचे लष्करी हवाई तळ निष्क्रिय झाले. भारताच्या कठोर कारवाईमुळे पाकिस्तानला लष्करी कारवाया थांबवण्याची विनंती करावी लागली.
ट्रम्प यांना दुरध्वनीवर नेमके काय म्हणाले होते पीएम मोदी
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की या संपूर्ण घटनेदरम्यान कधीही भारत-अमेरिका व्यापार करारावर किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा कोणताही प्रस्ताव मांडला नाही. लष्करी कारवाई थांबवण्याची चर्चा भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट दोन्ही सशस्त्र दलांमधील विद्यमान संपर्क माध्यमांद्वारे झाली आणि ती पाकिस्तानच्या विनंतीवरून सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की भारत मध्यस्थी स्वीकारत नाही आणि कधीही स्वीकारणार नाही. या विषयावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे












Click it and Unblock the Notifications