बांगलादेशात हिंसाचार! जवळपास 1 हजार भारतीय विद्यार्थी परतले मायदेशी...

सध्या बांगलादेशातील सरकारी नोकरी मधील आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळे केल्या जाणाऱ्या निदर्शनांना हिंसक वळण लागले आहे. आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळल्याचे चित्र दिसून येत आहे.

आतापर्यंत या हिंसाचारामध्ये 105 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाले आहेत तर आंदोलन आणि हिंसाचारात सातत्याने वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण झाला आहे.त्याच पार्श्वभूमीवर देशात अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

Bangladesh violence

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. देशभरामध्ये लष्करांची तैनात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी काही सूचना स्पष्ट केले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय उच्च आयुक्तालय आणि चितगाव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथील सहाय्यक उच्चायुक्त कार्यालयाने भारतीय कार्यरत असल्याचे सांगितले आहे.

विद्यार्थी मायदेशी परतले..

प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या माहितीनुसारआज 20 जुलै रोजी बांगलादेशातील विविध भू बंदरावरून 778 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले तर 200 विद्यार्थ्यांना ढाका आणि चितगाव येथील विमानतळाहून भारतात आणण्यात आला आहे. अशा एकूण जवळपास 1000 भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

मदतीसाठी 24 तास आपत्कालीन नंबर बांगलादेशातील विविध विद्यापीठांमध्ये उरलेल्या 4000 हून अधिक विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात येत असल्याचे एमइए निवेदनात सांगितले आहे. भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी 24 तास सुरू राहणारे आपत्कालीन नंबरही सुरू केले आहेत.

आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे डाका आणि चितगाव येथून भारताला अखंडित उड्डाण सेवा सुनिश्चित करण्यासाठी आयोग बांगलादेशच्या नागरिक उड्डाण प्राधिकरणाने व्यावसायिक विमान कंपन्यांशी समन्वय साधत असल्याची माहिती देखील मिळत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+