Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

World Water Day 2025 : जागतिक जल दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, थीम अन् त्याचे महत्त्व

World Water Day 2025 : घरात एक दिवस पाणी नसलं की घरातरी सर्व कामे ठप्प होतात. उन्हाळात पाण्याची टंचाई समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. पाणी ही जगातील मोठी समस्या बनत आहे. पाण्याशिवाय येणाऱ्या पिढ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी 'जागतिक जल दिन' साजरा केला जातो.

पाण्याचा अपव्यय थांबवणे महत्त्वाचे आहे कारण पृथ्वीवरील पाण्याचा फारच कमी भाग आपल्या वापरासाठी योग्य आहे. वाढती लोकसंख्या, प्रदूषण आणि वातावरणातील बदल यामुळे जलसंकट अधिक गंभीर बनले आहे. जगातील मोठ्या लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. आजचा दिवस लोकांना जलसंकट आणि त्यावर उपाय याविषयी विचार करण्याची प्रेरणा देतो.

World Water Day 2025

जागतिक जल दिनाचे महत्त्व

जागतिक जल दिन आपल्याला आठवण करून देतो की पाणी ही आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान देणगी आहे. पाण्याशिवाय तहान भागू शकत नाही, शेतं हिरवीगार राहू शकत नाहीत, पोट भरता येत नाही, रोजची कामेही करता येत नाहीत. परंतु आज जगातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई ही गंभीर समस्या बनली आहे.

वाढते प्रदूषण, कारखान्यांचे घाण पाणी, प्लास्टिक व कचरा नद्या-तलावांमध्ये मिसळत आहे, त्यामुळे स्वच्छ पाणी घाण होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळत आहेत आणि पावसाचे स्वरूप बिघडले आहे. कुठे दुष्काळ तर कुठे पूर. पाण्याचा अतिरेक आणि अपव्यय हे देखील एक मोठे कारण आहे. बरेच लोक पाण्याचा अपव्यय करतात, जसे की नळ उघडे ठेवणे किंवा शेतीत आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरणे. भूजलाचे शोषण आणि जंगलतोड ही देखील पाणी टंचाईची प्रमुख कारणे आहेत.

जागतिक जल दिनाचा इतिहास

1992 मध्ये युनायटेड नेशन्स ने आयोजित केलेल्या "रिओ दि जानेरो अर्थ समिट" मध्ये जागतिक जल दिन साजरा करण्याची कल्पना उदयास आली होती... या परिषदेत जलसंकट आणि शाश्वत विकास यावर चर्चा करण्यात आली आणि जलसंधारणाबाबत जागतिक स्तरावर जागरुकता वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर, संयुक्त राष्ट्र महासभेने 22 डिसेंबर 1992 रोजी एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये दरवर्षी 22 मार्च रोजी "जागतिक जल दिन" साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला... हा दिवस पहिल्यांदा 22 मार्च 1993 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी वेग वेगळ्या थीमने साजरा केला जातो...

पाण्याची उपलब्धता आणि पाण्याचे संकट

पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, समुद्र, नद्या, सरोवरे आणि हिमनद्या मिळून पृथ्वीवर भरपूर पाणी आहे. परंतु त्यातील 97.5% खारे पाणी आहे जे महासागरांमध्ये आहे... पण फक्त 1% भाग ताजे आणि वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.... त्यातही प्रदूषण, पाण्याचा अपव्यय आणि वातावरणातील बदल यामुळे पाणी दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय.... साधारण सरासरी १ व्यक्ती दररोज सुमारे 80-100 गॅलन पाणी वापरते.. सुमारे 2 अब्ज लोकं पुरेसे पाणी नसल्यामुळे संघर्ष करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी किव्हा घरातील गळणारे नळ वर्षाला 3,000 गॅलन पाणी वाया घालवू शकतात... असा अंदाज लावण्यात आला आहे... आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापेक्षा 5 मिनिटांपर्यंत अंघोळ कमी केल्यास 10-15 गॅलन पाणी वाचू शकते असा अंदाज आहे.

या वर्षाची थीम

यावेळी 2025 मधील जागतिक जल दिनाची थीम "ग्लेशियर संरक्षण" आहे. म्हणजे की जगभरातील स्वच्छ पाणी राखण्यासाठी हिमनद्या खूप मोठी भूमिका बजावतात आणि आपण त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे... हिमनद्यांचे सर्वक्षण केल्यास पिण्याचे पाणी, शेतीसाठी वापरले जाणारे पाणी यासाठी उपयोगात येतात.. परंतु बदलत्या हवामानामूळे त्याचा परिणामूळे वितळत आहेत. त्यांना वाचवणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर येणाऱ्या काळात पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पाणी हे आपल्या सर्वांसाठी जीवन आहे आणि ते वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या जागतिक जल दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करूया.. नळ दुरुस्त करणे, कमी पाणी वापरणे आणि पावसाचे पाणी साठवणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी आपलं भविष्य सुरक्षित बनवू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+