भारतात कोणत्या-कोणत्या रेल्वेस्टेशनवर झाली चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा थक्क करणारा, वाचा इतिहास
New Delhi Stampede : शनिवारची रात्र अर्थात (15 फेब्रुवारी २०२५) रात्र देशासाठी काळी रात्र ठरली आहे. शनिवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आणि 10 हून अधिक जण जखमी झाले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे.
तथापि, रेल्वेच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे लोकांचे जीव गेले आहेत अशी ही देशातील पहिलीच घटना नाही. यापूर्वीच देखील म्हणजेच, 2004, 2007, 2013 आणि 2017 मध्ये घडलेल्या अशाच दुर्घटना कोणीही विसरू शकत नाही ज्यात अनेक महिला, मुले आणि वृद्धांचा मृत्यू झाला होता. एकप्रकारे मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला होता.

याआधी देशात असे अपघात कधी घडले ते सविस्तर जाणून घ्या...
- तुम्हाला सांगतो की १३ नोव्हेंबर २००४ रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर छठपूजेसाठी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान, अचानक बिहारला जाणाऱ्या ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला आणि गोंधळ उडाला. ट्रेन पकडण्यासाठी लोक ओव्हरब्रिजवर एकमेकांवर पडले. या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले.
- 3 ऑक्टोबर 2007 चा दिवस विसरता येणार नाही. या दिवशी, जिवतीया व्रतामुळे, मुघल सराय स्टेशनवर गंगेत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बनारसला जात होते. त्यादरम्यान गर्दीत चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक जण जखमी झाले.
- 10 फेब्रुवारी 2013 रोजी प्रयागराज कुंभमेळ्यादरम्यान रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले.
- 2010 मध्ये नवी दिल्ली स्टेशनवरही अशीच एक घटना घडली होती. मे 2010 मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पाटण्याला जाणाऱ्या ट्रेनचा प्लॅटफॉर्म अचानक बदलण्यात आला होता. बिहार संपर्क क्रांती ट्रेन प्लॅटफॉर्म 13 वर येणार होती पण ट्रेन प्लॅटफॉर्म 12 वर आल्याने गोंधळ उडाला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 15 जण जखमी झाले.
- 28 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईतील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात रेल्वे अपयशी ठरली
स्थानकांवरील प्रचंड गर्दी नियंत्रित करण्यात रेल्वे वारंवार अपयशी ठरली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेकडे कोणतेही प्रभावी साधन नाही, ज्याची किंमत प्रवाशांना आपल्या जीवाने मोजावी लागते. भविष्यात देशाला मोठी किंमत मोजावी लागू नये म्हणून रेल्वेला या अपघातांपासून धडा घ्यावा लागेल आणि त्यांचे व्यवस्थापन सुधारावे लागेल.












Click it and Unblock the Notifications