प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनात काय फरक आहे? वाचा संपूर्ण माहिती
येत्या २६ जानेवारीला संपूर्ण भारतात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी संपूर्ण देशात उत्ताहाचे वातावरण असणार आहे. प्रजासत्ताक दिनी आपल्या भारताने संविधान स्विकारले एवढंच आपल्याला माहित आहे. मात्र प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन दोन वेगवेगळे उत्सव कसे, हा प्रश्न आपल्याला पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूयात.

स्वातंत्र्य व संविधानात अंतर
भारत 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश मुक्त झाला. 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो. मग प्रश्न पडतो की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता? तब्बल दोन वर्षं, 5 महिने आणि 11 दिवस भारताची काय परिस्थिती होती? तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही राज्यघटनेवरच त्याचा कारभार सुरु होता.
घटनेला मुर्त्य रूप कधी?
देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहिण्यात आला. या 141 दिवसांनी घटनेला मुर्त्य रुप आलं.
संविधान दिवस कोणता?
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने भारतीय घटनेचा मसुदा तयार केला होता. त्यासाठी मेहनत घेतली होती. तीच राज्यघटना २६ नोव्हेंबरला स्विकारण्यात आली. तेव्हापासून हा दिवस संविधान दिवस म्हणून गणला गेला.
प्रजासत्ताक दिवस कोणता?
26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो. ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो. आपला देश हा तेव्हापासून प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेकडून चालणारा झाला. जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात.












Click it and Unblock the Notifications