मोठी बातमी: भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव; शुभेंदु अधिकारींकडून मोठा पराभव
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भवानीपूर मतदारसंघातून पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तृणमूल काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या बंगालमध्ये १५ वर्षांनंतर ममता बॅनर्जींची सत्ता संपुष्टात आली असून भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी त्यांचा १५,११४ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. या विजयासोबतच बंगालमध्ये आता भगवा फडकणार हे स्पष्ट झाले असून भारतीय जनता पक्षाने ममता बॅनर्जींच्या साम्राज्याला सुरुंग लावत राज्याच्या राजकारणात नवा इतिहास लिहिला आहे.

निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बंगालच्या २९४ जागांपैकी भाजपने २०९ जागांवर प्रचंड आघाडी घेत बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. ममता बॅनर्जींच्या दीर्घकालीन शासनाला आव्हान देत भाजपने मिळवलेला हा विजय सुशासनाचा विजय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांचा स्वतःचा पराभव हा या निवडणुकीतील सर्वात मोठा 'टर्निंग पॉईंट' ठरला असून, बंगालच्या जनतेने यावेळेस बदलाच्या बाजूने आपला कौल दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. १५ वर्षांच्या सत्तेनंतर ममता बॅनर्जींना पायउतार व्हावे लागणे, हा भारतीय राजकारणातील या वर्षातील सर्वात मोठा उलटफेर मानला जात आहे.












Click it and Unblock the Notifications