जसंं पांडवांनी द्रौपदीला दावावर लावंल तसं आमच्या बहिणी, मुलींचाही..! बृजभूषण सिंहांचं वक्तव्य चर्चेत
Vinesh Phogat Bajrang Punia :भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी रविवारी हुडा कुटुंबावर जोरदार आरोप केले आहेत. "जसं पांडवांनी द्रौपदीला दावावर लावंल होतं तसंच आमच्या बहिणी, मुलींचा सन्मान दावावर लावून हुड्डा फॅमिली जे राजकारण खेळत आहे त्याला येणारा काळ माफ करणार नाही. या गोष्टींचे ते नेहमी गुन्हेगार राहतील. " अशी टीका बृजभूषण सिंह यांनी केली आहे.
कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी बृजभूषणसिंह यांचं वक्तव्य आले आहे.

नेमकं काय म्हणाले बृजभूषणसिंह?
बृजभूषणसिंह म्हणाले, घटना घडतात तेव्हा बुद्धी चालते. महाभारतात द्रौपदीला दावावर लावून जुगार खेळला गेला होता आणि त्यात पांडव हरले.देश या गोष्टींसाठी पांडवांना माफ करणार नाही. तसंच आमच्या बहिणी,मुलींचा सन्मान दावावर लावून हुड्डा फॅमिली जे राजकारण खेळत आहे त्याला येणारा काळ माफ करणार नाही. या गोष्टींचे ते नेहमी गुन्हेगार राहतील.
तीन खटले पण मी बाहेर..
बृजभूषणसिंह म्हणाले, ज्या तीन प्रमुख घटनांत न्यायालयात खटले सुरु आहेत, त्यात माझ्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत. त्यातील तिन्ही प्रकरणी मी आज बाहेर आहे. यातल्या साऱ्या गोष्टी जेव्हा बाहेर येतील तेव्हा त्यांना या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत.
जुलानामधून विनेशला काँग्रेसची उमेदवारी
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काही दिवसांपुर्वी काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जुलानामधून विनेश फोगट यांना उमेदवारी दिली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने सहकारी कुस्तीपटू विनेश फोगटला पाठिंबा देत तिच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शनिवारी बजरंग पुनिया यानं संघटनेत काम करणार आणि पक्षाच्या 'हायकमांड'नं दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचं सांगितलं.
बृजभूषणसिंहच्या आरोपांचं पुनियाकडून खंडन
विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेशावर संपूर्ण कुस्तीपटूंचे आंदोलन हे काँग्रेस पक्षानं आयोजित केलेलं "षडयंत्र" होतं, असं बृजभूषण यांनी शुक्रवारी वक्तव्य केलं होतं. या आरोपांच बजरंग पुनिया यानं खंडन केलं. तो म्हणाला, "त्यावेळी राजकारणाशी आमचा काहीही संबंध नव्हता. आम्ही सुरुवातीला कोणत्याही राजकारण्यांना आमच्या मंचावर येऊ दिले नाही... कथा मांडणे हे त्यांचे काम आहे... असे काहीही नाही," एएनआयच्या वृत्तात म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications