Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Vande Mataram : काँग्रेस Vs भाजप; शहा म्हणाले- वंदे मातरमला विरोध करणे हे गांधी कुटुंबाच्या रक्तातच!

Vande Mataram : मंगळवारी राज्यसभेत 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेने केंद्र आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय वादंग निर्माण केला. गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यातील शाब्दिक युद्धात इतिहास, राजकीय वारसा आणि अर्थव्यवस्थेचे मुद्दे मध्यभागी आले.

अमित शहा: 'वंदे मातरम्'ला विरोध गांधी कुटुंबाच्या रक्तात

गृहमंत्री अमित शहा यांनी थेट गांधी कुटुंबाला लक्ष्य करत, 'वंदे मातरम्'ला विरोध करण्याची सुरुवात नेहरूंपासून झाली असल्याचा आरोप केला.

शहा म्हणाले की, ज्यांना 'वंदे मातरम्'चे महत्त्व समजत नाही, तेच या गीताच्या चर्चेला निवडणुकीशी जोडत आहेत. त्यांचे हे विधान एक दिवस आधी लोकसभेत प्रियंका गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर होते.

Vande Mataram

प्रियंका गांधींची टीका

प्रियंका गांधींनी प्रश्न विचारला होता की, 'वंदे मातरम्'वर आता चर्चा का होत आहे? त्यांचे मत होते की बंगालच्या निवडणुका जवळ आल्यामुळे मोदी सरकार त्यात भूमिका बजावू इच्छिते.

गांधी कुटुंबाची अनुपस्थिती

शहा यांनी आक्षेप घेतला की, जेव्हा 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत चर्चा सुरू झाली, तेव्हा गांधी कुटुंबातील दोन्ही सदस्य (राहुल गांधी आणि प्रियंका गांधी) अनुपस्थित होते.

ऐतिहासिक संदर्भ

शहा यांनी दावा केला की, नेहरूंपासून काँग्रेस नेतृत्वात 'वंदे मातरम्'ला विरोध सुरू आहे आणि त्यामुळे 'वंदे मातरम्'ला विरोध करणे हे गांधी कुटुंबाच्या रक्तात आहे.

मल्लिकार्जुन खरगे: अर्थव्यवस्थेवर चर्चा कधी?

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत भाजपला प्रतिआव्हान दिले आणि नेहरूंच्या वारशाचा बचाव केला.

अर्थव्यवस्था केंद्रस्थानी !

घसरत्या रुपयाचा मुद्दा: खरगे यांनी मागणी केली की, भाजपने 'वंदे मातरम्' सोबतच डॉलरच्या तुलनेत सतत घसरत असलेल्या रुपयावरही चर्चा करावी.

मोदींना जुन्या विधानाची आठवण: खरगे यांनी २०१२ मधील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मोदींनी विचारलेल्या प्रश्नाची आठवण करून दिली. मोदींनी तेव्हा रुपया घसरण्यास भ्रष्ट राजकारण जबाबदार असल्याचे म्हटले होते.

खरगेंचा प्रतिप्रश्न

खरगे म्हणाले, "मी विचारतो, तुमच्यासोबतही असेच घडले का? तुम्हीही भ्रष्ट आहात का? तुमच्या सरकारमधील परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. तेव्हा डॉलर ५५-६० रुपये होता, आज १०० रुपये आहे."

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खरगेंना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आज फक्त 'वंदे मातरम्'वर लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली. यावर नड्डा म्हणाले, "वंदे मातरमची चर्चा करा, आम्ही अर्थव्यवस्थेवरही चर्चा करू."

नेहरूंचा बचाव!

खरगे यांनी अमित शहा यांना विचारले की पंतप्रधान आणि गृहमंत्री फक्त नेहरूंनाच का लक्ष्य करतात? त्यांनी स्पष्ट केले की, 'वंदे मातरम्'च्या पहिल्या दोन श्लोकांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये गायन करण्याची शिफारस करणारा ठराव नेहरू, महात्मा गांधी, मौलाना आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि गोविंद वल्लभ पंत यांच्यासह काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी एकमताने मंजूर केला होता. खरगे म्हणाले की, भाजप नेहरूंचे नाव घेऊन सामूहिक निर्णय घेणाऱ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा अपमान करत आहे.

खरगेंचे 'वंदे मातरम्' ने भाषणाचे उद्घाटन

मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात "वंदे मातरम, वंदे मातरम" असा जयघोष करून केली. ते म्हणाले, "मी भाग्यवान आहे. मी हे गाणे गेल्या ६० वर्षांपासून गात आहे. जे वंदे मातरम् गात नाहीत त्यांनी नुकतेच गाणे सुरू केले आहे.

त्यांनी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना आणि स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली आणि १८९६ मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा 'वंदे मातरम्' गायल्याची आठवण करून दिली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+