अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात, मात्र या पंतप्रधानांवर आली होती अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ
Union Budget: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून काय हाती येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. कारण हा अर्थसंकल्प केवळ मोदी सरकारच्या सध्याच्या कार्यकाळातील आर्थिक योजनेची दिशा निश्चित करणार नाही तर देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होईल असा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा आणि नवीन योजनांवर लक्ष ठेवले जाईल.
केंद्रीय अर्थसंकल्प हा भारतीय आर्थिक दिनदर्शिकेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दरवर्षी अर्थसंकल्पात होणाऱ्या घोषणांची जनतेमध्ये चर्चा ही होत असते. विशेष म्हणजे इतिहासात असे बरेच प्रसंग आले आहेत जेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी स्वतः अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळताना अनेक केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले आहेत.

या ऐतिहासिक क्षणांनी भारतीय अर्थसंकल्प या प्रक्रियेला एक विशेष ओळख दिली आहे. इतिहासाच्या कान्याकोपऱ्यात त्यांची छाप सोडणारे असे अनेक क्षण आहेत. या ऐतिहासिक क्षणांमध्ये काही महत्वाच्या बाबी जाणून घेऊया. तुम्हाला माहितीये का देशाच्या राजकारणात असे काही पंतप्रधान होऊन गेले आहेत, ज्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या पंतप्रधानांनी वित्तखात्याची धुरा सांभाळत स्वता:हा अर्थसंकल्प सादर करत इतिहास घडवला आहे. कोण आहेत हे पंतप्रधान तर जाणून घेऊया.
जवाहरलाल नेहरू
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी 1958 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी मुंद्रा घोटाळा उघडकीस आल्यानंतर 12 फेब्रुवारी 1958 रोजी अर्थमंत्री टी. कृष्णमाचारी यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर नेहरूंनी अर्थमंत्रीपदाचा अर्थसंकल्प सादर केला.
मोरारजी देसाई
1977 ते 1979 पर्यंत जनता पक्षाच्या सरकारमध्ये असलेले मोरारजी देसाई यांनी भारतात सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले (8 वार्षिक आणि 2 अंतरिम). अर्थमंत्री म्हणून त्यांनी 1959 ते 1963 पर्यंत सतत अर्थसंकल्प सादर केला आणि 1967, 1968, 1969 चे अर्थसंकल्प सादर केले आहेत.
इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी 1970 चा अर्थसंकल्प सादर केला. एका वर्षानंतर त्यांनी यशवंतरावांना मंत्री म्हणून नियुक्त केले गेलं.
राजीव गांधी
राजीव गांधी यांनी जानेवारी ते जुलै 1987 पर्यंत अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. बोफर्स भ्रस्ष्ट्राचार प्रकरणावरुन व्ही.पी. सिंग यांना अर्थमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे राजीव गांधी यांना अर्थसंकल्प सादर करावा लागला.
मनमोहन सिंग
मनमोहन सिंग यांनी 1991 ते 1996 पर्यंत पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. 1991 मध्ये सादर केलेला आम आदमी अर्थसंकल्प हा भारतातील सर्वात मोठ्या बदलांपैकी एक मानला जातो. या अर्थसंकल्पात आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा पुरस्कार करण्यात आला, ज्याने भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी 1994 च्या अर्थसंकल्पातून आपली सेवा सुरू केली, जो आज सरकारसाठी उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे.












Click it and Unblock the Notifications