परदेशी सहलीही करता येतात ट्रेनने! भारतातील या 7 रेल्वे स्थानकावरुन तुम्ही परदेश ट्रीप करु शकता
Foreign Trip by Railway: परदेशात जायचं म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येत ते विमान प्रवास आणि पासपोर्ट पण तुम्ही ना विमान आणि पासपोर्टशिवाय ट्रेनने असे काही देश आहेत जिथे तुम्ही ट्रेनने जाऊ शकता. भारतातील काही अशी रेल्वे स्थानके आहेत, जी आपल्या शेजारील देशांशी थेट जोडलेली आहेत. ही रेल्वे स्थानके केवळ प्रवास किफायतशीर बनवत नाहीत तर एक वेगळा अनुभवही देतात.
या स्थानकांवरून तुम्ही नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये ट्रेनद्वारे सहज पोहोचू शकता. ही स्थानके केवळ प्रवासी वाहतुकीपुरती मर्यादित नाहीत, तर भारत आणि या शेजारी देशांमधील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करतात.

भारतात एकूण सात आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानके आहेत, जी जवळच्या सीमांना जोडून प्रवाशांना आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रवासासाठी एक अनोखा पर्याय देतात. चला, जाणून घेऊया या खास रेल्वे स्थानकांविषयी...
हल्दीबारी रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल (Haldibari Railway Station, WB)
कूचबिहार जिल्ह्यातील हल्दीबारी रेल्वे स्थानक बांगलादेश सीमेपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. येथून प्रवासी रेल्वेने बांगलादेशला सहज जाऊ शकतात.
जयनगर रेल्वे स्टेशन, बिहार (Jainagar Railway Station, Bihar)
नेपाळला भेट देऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी जयनगर रेल्वे स्टेशन सर्वात योग्य आहे. हे स्थानक बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात आहे. नेपाळला जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
पेट्रापोल रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल (Petrapol Railway Station, WB)
उत्तर 24 परगणा जिल्ह्यात असलेल्या पेट्रापोल रेल्वे स्थानकावरून प्रवासी बांगलादेशलाही जाऊ शकतात. येथून दररोज मोठ्या संख्येने लोक दोन्ही देशांच्या सीमा ओलांडतात.
सिंगाबाद रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल (Singabad Railway Station, WB)
मालदा जिल्ह्यात असलेले सिंगाबाद रेल्वे स्टेशन बांगलादेशशी जोडलेले आहे. हे स्थानक प्रवाशांच्या प्रवासासाठीच महत्त्वाचे नाही तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापारालाही चालना देते.
जोगबनी रेल्वे स्टेशन, बिहार (Jogbani Railway Station, Bihar)
बिहारमधील जोगबनी येथे असलेले हे रेल्वे स्थानक नेपाळला जाण्यासाठी एक प्रमुख पर्याय आहे. येथून प्रवासी ट्रेनने किंवा पायी नेपाळला पोहोचू शकतात.
राधिकापूर रेल्वे स्टेशन, पश्चिम बंगाल (Radhikapur Railway Station, WB)
उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात असलेल्या राधिकापूर रेल्वे स्थानकाचा वापर प्रामुख्याने भारत आणि बांगलादेशमधील व्यापारासाठी केला जातो. मात्र, येथून प्रवासी रेल्वेने बांगलादेशलाही जाऊ शकतात.
अटारी रेल्वे स्टेशन, पंजाब (Atari Railway Station, Punjab)
पंजाबमधील अटारी रेल्वे स्थानक हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. हे स्थानक पाकिस्तानात जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेससाठी ओळखले जाते. तथापि कलम 370 हटवल्यानंतर ही सेवा 2019 पासून बंद करण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications