टोल एजन्सीची लवकरचं होणार सुट्टी, सरकारकडून नवीन मॉडेलवर काम सुरु, काय असणार नवीन मॉडेल घ्या जाणून
Toll News : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल वसुलीच्या पद्धतीत मोठा करण्याच्या तयारीत आहे. आता टोल एजन्सीऐवजी बँकांना टोल वसुलीची जबाबदारी देण्याची तयारी सुरू आहे. या संदर्भात नुकतीच बँकांसोबत बैठक झाली आहे, आणि बँकांनी हे काम करण्यास सहमती दर्शविली आहे. बँकांसाठी टोल वसुलीचे मॉडेल काय असेल यावर मंत्रालय विचारविनिमय करत आहे आहे.
या नवीन योजनेंतर्गत, टोल वसुली अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा दावा मंत्रालयाने केला आहे. या बदलामुळे टोल प्लाझावरील गैरप्रकारांना आळा बसेल आणि वाहनचालकांना अधिक चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या मते देशातील 1.5 लाख किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग नेटवर्कपैकी सुमारे 45,000 किलोमीटरवर टोल वसूल केला जात आहे. देशभरात 1063 टोल प्लाझा आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत टोल वसुली प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या आहेत. फास्टॅग सिस्टमच्या यशानंतर आता मंत्रालयाने टोल वसुलीची जबाबदारी थेट बँकांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या टोल वसुलीचे काम खासगी टोल एजन्सींकडून केले जाते, त्यांच्यावर अनेकदा गैरप्रकारांचे आरोप होतात. यामध्ये चुकीच्या टोल आकारणीपासून ते वाहनचालकांशी असभ्य वर्तनापर्यंतच्या तक्रारींचा समावेश आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि टोल वसुली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवण्यासाठी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
या नवीन योजनेंतर्गत, बँकांना टोल वसुलीची जबाबदारी दिली जाईल, आणि त्यांच्याकडूनच टोल प्लाझाचे व्यवस्थापन केले जाईल. बँकांच्या मजबूत आर्थिक आणि तांत्रिक पायाभूत सुविधांमुळे ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वास मंत्रालयाला आहे. याशिवाय, बँकांकडे आधीच डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंटची चांगली यंत्रणा आहे, ज्यामुळे टोल वसुलीतील गैरप्रकार कमी होतील.
टोल झंझट लवकरचं संपणार
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात टोल प्लाझा रद्द केले जातील. यामुळे चालकांचा वेळ वाचेल. पूर्वी जीपीएस आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून टोल वसूल करण्याची योजना होती, परंतु आता त्यात बदल करण्यात आले आहेत. न थांबता टोल वसूल करण्यासाठी ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, टोल वसुलीचे काम बँकांकडे सोपवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी अनेक सरकारी बँकांसोबत बैठका झाल्या आहेत. बँका ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन) द्वारे टोल वसुलीसाठी सज्ज झाल्या आहेत. टोलचा भार बँकांकडे जाईल. यानंतर ते ते NHAI कडे सोपवतील. त्या बदल्यात, बँका उच्च दर्जाचे कॅमेरे खरेदी करून ते बसवण्याचे काम करतील. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बँका किती दिवस पैसे स्वतःकडे ठेवतील यावर सध्या विचारविनिमय केला जात आहे. त्याचे मॉडेल देखील लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications