मोठी बातमी : पहलगाममधील हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; दोन दहशतवाद्यांचा खात्मा!
Terrorist infiltration attempt in Uri foiled by soldiers : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा जखमा ताज्या आहेत, अशातच दुसऱ्याच दिवशी दहशतवाद्यांचा उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न भारतीय जवानांनी उधळून लावला आहे. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. वनइंडिया इंग्रजीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
उत्तर काश्मीर येथील उरी येथे ही घुसखोरी सुरु होती, दरम्यान सध्या उरीत लष्करी जवान आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बारामुल्लाच्या उरी भागातील प्रकार
लोकमतच्या वृत्तानुसार, उरी येथे आज 23 एप्रिल 2025 रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न झाला. हा भाग उत्तर काश्मीरमध्ये मोडतो. जो की, पाकिस्तानी सीमेलगत आहे. आज झालेल्या घुसखोरीदरम्यान दोन ते तीन अतिरेक्यांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. बारामुल्ला येथील उरी येथील नाल्यातील सरजीवनच्या भागात हा घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय लष्कराने बारामुल्ला येथील नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडतानाच उरीजवळ झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले. पहलगाममध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली, ज्यात 28 पर्यटकांचा जीव गेला. पहलगाम हल्ल्याने देश हादरला आहे. सुरक्षा दल आता हाय अलर्टवर आहेत. या भागात उरलेले दहशतवादी शोधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. घुसखोरीचा हा प्रयत्न नियंत्रण रेषेवर सुरू असलेले धोके दाखवतो. पहलगाम हत्याकांडातील पीडितांसाठी देश शोक करत आहे. अधिकारी या घटनांना प्रतिसाद देत असल्याने सुरक्षा कार्ये सुरूच असतात. राजकीय आणि लष्करी नेते या संकटाचा सामना करण्यात गुंतल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे.
सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या सुमारास भारतीय पर्यटकाच्या समुहावर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला आणि अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मिडिया रिपोर्टनुसार, 26 जणांचा मृत्यू झाला तर बारापेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भारतीय लष्कर हायअलर्ट मोडवर आहे तसेच या दोन्ही घटनांनंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावाही घेतला जात आहे.
टीआरएफने घेतली हल्ल्याची जबाबदारी
पहलगाम येथील दहशदवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची जबाबदारी लष्कर -ए-तोयबाच्या द रेस्टीस्टंट फ्रंड अर्थात टीआरएफने घेतली आहे. टीआरएफचा जम्मू-काश्मीरात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरु असुन ते बाहेरुन काश्मीरात आलेल्या भारतीयांना टार्गेट करत असल्याचे बोलले जाते.
(हे वृत्त अपडेटत होत आहे...)
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे








Click it and Unblock the Notifications