अभिनेता-नेता विजय यांच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली, नेमकं काय घडलं, मृत्यूचा तांडव कसा घडला?
शनिवारी संध्याकाळी तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश आहे, यासंदर्भात तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम.ए. सुब्रमण्यम यांनी माहिती दिली. या अपघातात तीस पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता-राजकारणी विजय यांच्या पक्षाच्या तमिळगा वेट्टी कझगम (TVK) च्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर आले होते. विजय यांच्या भाषणादरम्यान प्रचंड गर्दी वाढली, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
The unfortunate incident during a political rally in Karur, Tamil Nadu, is deeply saddening. My thoughts are with the families who have lost their loved ones. Wishing strength to them in this difficult time. Praying for a swift recovery to all those injured.
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2025
गर्दीत अडकल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि अनेक लोक आणि कार्यकर्ते बेशुद्ध पडू लागले. परिस्थिती बिकट होताना पाहून विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर ते भाषण सोडून त्या ठिकाणाहून निघून गेले.
तामिळनाडूच्या CMने दिले विजय यांच्या चौकशीचे आदेश
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आणि करूर येथून येणारे अहवाल चिंताजनक असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, "गर्दीत अडकलेल्या आणि बेशुद्ध झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे आणि वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश मी दिले आहेत. मी माजी मंत्री सेंथिल बालाजी, मंत्री सुब्रमण्यम एमए आणि जिल्हाधिकाऱ्यांशी याबद्दल बोललो आहे.
#WATCH | Tamil Nadu: A large number of people attended the campaign of TVK (Tamilaga Vettri Kazhagam) chief and actor Vijay in Karur
— ANI (@ANI) September 27, 2025
A stampede-like situation reportedly occurred here. Several people fainted and were taken to a nearby hospital. More details are awaited.… pic.twitter.com/4f2Gyrp0v5
तामिळनाडूमध्ये सत्ता परिवर्तनाचे दावे
विजय यांनी आपल्या भाषणात असेही सांगितले की, पुढील सहा महिन्यांत तामिळनाडूच्या राजकारणात सत्ता परिवर्तन होईल. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांच्या राज्यव्यापी मोहिमेचा हा भाग होता. अधिकारी आणि आयोजकांनी परिस्थिती नियंत्रित केली आणि रॅली अधिक व्यत्यय न आणता संपली.












Click it and Unblock the Notifications