सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 'स्टाफ सलेक्शन' परिक्षेत मोठा बदल! चालाखी चालणार नाय
Staff Selection Commission Big change in exams : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. Staff Selection Commission अर्थात कर्मचारी निवड आयोग (SSC) ने आपल्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिक्षेत तुम्हाला मुन्नाभाई स्टाईल काॅपी करता येणार नाही ना तुमची कोणतीही चालाखी कामी येणार...
आता एसएससी भरती परीक्षेत उमेदवारांची ओळख आधार आधारित बायोमेट्रिक प्रणालीद्वारे केली जाईल. ही नवीन प्रणाली मे 2025 पासून लागू होईल आणि सध्या ती ऐच्छिक आधारावर स्वीकारली जाईल. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

तोतया उमेदवारांना बसणार चाप
बनावट ओळख आणि परीक्षेला दुसऱ्याच्या जागी बसणे यासारख्या बाबींबाबत अनेकदा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्या आता थांबतील अशी अपेक्षा आहे. हा निर्णय का घेतला गेला? या नव्या प्रणालीमुळे परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असल्याचे एसएससीचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानामुळे परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष होईल.
आधारवर आधारीत बायोमॅट्रीक पडताळणी
आधार क्रमांकाद्वारे परिक्षार्थ्यांच्या ओळखीची पडताळणी होणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना, फॉर्म भरताना आणि परीक्षा केंद्रावर त्यांची उपस्थिती नोंदवताना उमेदवारांना आता आधार कार्डद्वारे त्यांची ओळख निश्चित करावी लागेल. यामुळे फसवणूक आणि कॉपीसारख्या समस्यांना आळा बसू शकणार आहे.
डमी उमेदवार अन् फसवणुकीची शक्यता कमी होणार
एसएससी जो निर्णय घेणार आहे, त्यामुळे परिक्षेत शासनाची फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल तसेच डमी उमेदवार लगेचच ओळखला जाऊ शकणार आहे. एसएससीला अनेकदा तक्रारी येतात की काही लोक इतरांच्या वतीने परीक्षेला बसतात. आता आधार आधारित पडताळणीद्वारे अशा प्रकरणांमध्ये थेट कारवाई करणे शक्य होणार आहे.
सरकारचा ग्रीन सिग्नल
एसएससीने घेतलेल्या या बदलासाठी सरकारने यापूर्वीच हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे 12 सप्टेंबर 2024 रोजी, केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने SSC ला ही प्रक्रिया ऐच्छिक आधारावर अंमलात आणण्याची परवानगी दिली आहे.
कोणत्या परीक्षांवर परिणाम होईल?
एसएससीची ही नवीन प्रणाली त्याच्या सात प्रमुख अखिल भारतीय परीक्षा जसे की CGL (संयुक्त पदवी स्तर) आणि तीन विभागीय स्पर्धात्मक परीक्षांमध्ये लागू होईल. UPSC ने आधीच सुरुवात केली आहे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आधीच आधार आधारित ओळख प्रणालीचा अवलंब केला आहे. 28 ऑगस्ट 2024 रोजी UPSC ने यासंबंधी एक अधिसूचना जारी केली होती.












Click it and Unblock the Notifications