काय सांगता! 2100 सालापर्यंत लग्नाची संकल्पना संपणार; कुणीच लग्न नाही करणार, नेमकं काय होणार?
दिवसेंदिवस सामाजिक जीवनशैलीत सातत्याने बदल होत आहे. विवाह, प्रेमसंबंध, नातेसंबंध यासह खाणपाणं या सर्वच गोष्टींमध्ये बदल होत असल्याने त्याचा सामाजिक जीवनात देखील विपरीत परिणाम होत आहे. विवाहासारखे पवित्र बंधन येत्या काळात संपुष्टात येईल, असा दावा काही अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तर 2100 सालानंतर लग्नाची संकल्पना संपुष्टात येणार असल्याचा दावा काही अभ्यासकांनी व्यक्त केला. विशेषत: संस्कृतीप्रधान अशी ओळख असलेल्या भारत देशात हे घडायला सुरूवात होणार असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
लग्नाची संकल्पना बदलत चालली आहे. पूर्वी विवाह हे पवित्र बंधन मानला जात असे. एकदा लग्न झाले की पती-पत्नी वेगळे होण्याचा प्रश्नच नव्हता. काळानुसार विवाहासोबत घटस्फोटाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. विशेषत: अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीमधील किरकोळ मतभेदही घटस्फोटाने संपत आहेत.

ही कारण ठरू शकतात कारणीभूत
त्याचबरोबर दुसरीकडे, अवैध संबंध, लिव्ह-इन रिलेशनशिप, डेटिंग, श्रीमंत वर्गातील बायकांची अदलाबदल... या सर्व पद्धती ज्या पूर्वी परदेशापुरत्या मर्यादित होत्या, ज्या भारतात घृणास्पद आणि अश्लील मानल्या जात होत्या. त्या पद्धती, नातेसंबंध आता भारतातही पसरल्याचे गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आहोत. या सगळ्याचा परिणाम असा होतो की स्त्रियांना स्वतंत्र व्हायचे असून त्यांना लग्न नको आहे.
परिणामी, या सगळ्याचा दुष्परिणाम आगामी सहा सात दशकांमध्ये म्हणजे साधारण 2100 सालापर्यंत पर्यंत लग्न ही संकल्पना संपुष्टात येईल. कोणीही लग्न करणार नाही असा चिंताजनक अहवाल समोर आला आहे.
तज्ज्ञांचा व्हिडिओ व्हायरल...
याबाबत एका तज्ज्ञांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विवाहासारखे नातेसंबंध कसे आकार घेत आहेत आणि सामाजिक बदल, वाढती व्यक्तिवाद आणि लिंग भूमिका विकसित झाल्यामुळे पारंपारिक विवाह कसे अस्तित्वात राहणार नाहीत याचे विश्लेषण त्यामध्ये त्यांनी केले आहे. तरुण पिढी करिअर, व्यक्तिगत विकास आणि अनुभव यावर अधिक भर देत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा लग्न या संस्थेवर देखील होणार असल्याचा दावा करण्यात आला.
अवैध शारिरीक संबंधात वाढ..
विशेष करून लिव्ह इन रिलेशनशिप आणि अवैध संबंध वाढत आहेत. यामुळे विवाहाची गरज नाहीशी होत आहे. याशिवाय तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील प्रगती हेही एक कारण आहे. यामुळे भविष्यात मानवी नाती वेगळी दिसू शकतात, असे त्यांचे मत आहे.
महिलांना आता स्वावलंबी जीव हवे...
राहणीमानाच्या खर्चासारखे आर्थिक घटक देखील लोकांना लग्नाकडे कमी आकर्षित करत आहेत. विशेषत: महिलांना आता स्वावलंबी जीवन हवे आहे. त्यांना लग्नाच्या बंधनाची गरज नाही. लग्न हे एक बंधन आहे, जिथे त्यांना स्वातंत्र्य नाही, त्यांना भविष्य नाही, ते त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकत नाहीत, असा विचार करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे आजकाल बरेच लोक लग्न करण्याच्या तयारीत आहेत. नाहीत. लग्नानंतरही मुलं होण्यास कचरतात. हाच ट्रेंड असाच चालू राहिला तर 2100 पर्यंत लग्नसोहळा हा संस्कार काळानुसार संपुष्टात येईल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
1950 पासून देशांमध्ये जन्मदरात घट
लॅन्सेटच्या अभ्यासानुसार, सध्या पृथ्वीवर 8 अब्ज लोक राहतात. येत्या काही दिवसांत या संख्येत लक्षणीय बदल होणार आहेत. जागतिक स्तरावर लोकसंख्येचा प्रजनन दर झपाट्याने कमी होत आहे. या बदलाचा भविष्यात मानवावर अधिक परिणाम होईल, असे मानले जात आहे. 1950 पासून सर्व देशांमध्ये जन्मदर कमी होत आहे. 1950 मध्ये लोकसंख्येचा प्रजनन दर 4.84% होता. 2021 पर्यंत ते 2.23% पर्यंत खाली आले आहे. 2100 पर्यंत ते 1.59% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications