Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शिवजयंतीच्या पोस्टमध्ये राहूल गांधींकडून मोठी चूक, राजकीय नेत्यांसह शिवप्रेमींचा संताप

Shiv Jayanti 2025 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या दिवशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींसह देशभरातली विविध नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Congress leader Rahul Gandhi

महाराजांच्या जयंतीनिमित्त लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी आपल्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. या पोस्ट करताना राहूल गांधी यांच्याकडून एक मोठी चूक झाली आहे. या पोस्टमध्ये राहूल गांधी यांनी एक जुना फोटो पोस्ट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी शिवरायांची पूर्णकृती मूर्ती हातात धरुन उंचावून दाखवताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना राहुल गांधी यांनी "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.

आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील", असं त्यांनी आपल्या ट्टिटमध्ये म्हटलं आहे.

कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या या पोस्टवर आता विविध राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता नवीन वादाला तोंडल फुटलं आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शिवजयंती दिनी अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिल्याने राहुल गांधींवर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड करण्यात येत आहे.

राहूल गांधींच्या या पोस्टवर भाजपाकूडन टीका

राहूल गांधींच्या या पोस्टवर भाजपाकूडन टीका करण्यात आली आहे. भाजपा नेते अतूल भातखळकर यांनी एक ट्टिट करुन राहूल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भातखळकर यांनी आपल्या ट्टिटमध्ये आहे की, "ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. तीव्र निषेध..." असं ट्टिट भातखळर यांनी केलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+