शहीद दिवसानिमित्त थोर क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या कार्यावर खास उपयुक्त 3 भाषणं, वाचा
Shahid diwas 2025 Special 3 marathi speeches : महान क्रांतिकारी आणि देशाचे सुपुत्र भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना आजच्याच दिवशी 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली होती. त्यांची स्वातंत्र्यासाठी सर्वस्व आणि प्राणत्याग, बलिदान देशासाठी खूपच महत्वाचे आहे. कारण त्यांच्या बलिदानामुळे आपण आज स्वातंत्र्यात आहोत. इंग्रजी सत्ता उलथून टाकण्यासाठी या विरांनी सर्वस्व देशाला अर्पण केले. अशा विरांना नमन..
आज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या कार्यावर, जीवनावर आणि त्यांच्या देशसेवेवर आधारीत तीन खास भाषण देत आहोत. हे भाषण शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वांनाच उपयुक्त आहे. विद्यार्थी हे भाषण शाळेत देऊ शकतात.

शहीद दिवसासाठी भाषण -1
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव भारताचे हिरे होते. ते थोर क्रांतिकारी तर होतेच पण देशासाठी स्वःतच्या प्राणाची पर्वाही त्यांनी केली नाही. ते हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) चे सदस्य होते. या संघटनेचे उद्दिष्ट क्रांतिकारी कृतीतून ब्रिटीश शासन उलथून टाकणे हे होते. त्यांची सर्वात उल्लेखनीय कारवाई लाहोर षडयंत्र प्रकरण होते.
1928 मध्ये ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन साँडर्स याची हत्या झाली होती आणि हत्येचा आरोप त्यांच्यावर होता. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हे केले गेले होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अटक झाली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. व्यापक निषेध आणि क्षमायाचना करूनही, 23 मार्च 1931 रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये या क्रांतिवीरांना फाशी देण्यात आली. मृत्यूला न घाबरता सामोरे जाण्याचे धाडस या क्रांतिकारकांनी भारताच्या इतिहासात अजरामर केले.
शहीद दिवस भाषण - 2
अध्यक्ष महोदय आणि पुज्य गुरुजन वर्ग आज मी तुम्हाला भारत मातेच्या सुपुत्रांची कथा सांगणार आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे भारतमातेचे खरे सुपुत्र होते. ते असे क्रांतिकारी होते ज्यांच्यामुळे देश स्वातंत्र्य झाला. जीवाची बाजी लावून कुटुंबापासून दुरावत त्यांनी देशसेवेला महत्व दिली. त्यांनी आपल्या प्राणापेक्षा देशभक्ती आणि देशभक्तीला अधिक महत्त्व दिले आणि मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा थोर क्रांतिकाऱ्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. भाषणाच्या शेवटी मी आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करतो. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद जय भारत.
शहीद दिनानिमित्त 2 मिनिटांचे भाषण -3
उपस्थित सर्वांना सुप्रभात, आज हुतात्मा दिनानिमित्त, मी भारताच्या महान क्रांतिकारकांपैकी भारताच्या शूर सुपुत्रांचे स्मरण करत आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन वीरांना 23 मार्च रोजी ब्रिटीश सरकारने फाशी दिली. हे तिघेही भारतातील तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आनंदाने बलिदान दिले. तेव्हापासून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. आपल्या सर्वांना माहीतच आहे की भगतसिंग यांनी वयाच्या ८ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करायला सुरुवात केली आणि वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी आपले घर सोडले, धन्यवाद.












Click it and Unblock the Notifications