रामानुजाचार्य जयंती: गुरुच्या मृत शरीराकडे पाहून कळाली ग्रंथ लिहण्याची आज्ञा; कोण होते रामानुजाचार्य

भारताच्या भूमीवर असे अनेक संत आणि महापुरुष जन्माला आले. त्यांनी आपल्या चांगल्या विचारांनी आणि प्रेरणादायी कार्यांद्वारे लोकांना योग्य मार्गावर चालण्यास शिकवले. या महान संतांमध्ये एक प्रमुख नाव म्हणजे 'श्री रामानुजाचार्य'. शुक्रवारी २ मे रोजी रामानुजाचार्य यांची जयंती आहे. रामानुजाचार्यांनी आयुष्यभर वैष्णव धर्माचा प्रचार व प्रसार केला. असे सांगतात की, आपल्या गुरुच्या मृत शरीराकडे पाहून त्यांनी तीन ग्रंथ लिहले होते. काय आहे ती कथा? तेच आपण पाहूयात...

Who was Ramanujacharya

रामानुजाचार्य जयंती कधी आहे?

रामानुजाचार्य यांची जयंती चैत्र महिन्यात साजरी केली जाते. यावर्षी श्री रामानुजाचार्य जयंती २ मे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. ही रामानुजाचार्य यांची १००८ वी जयंती आहे. अर्द्रा नक्षत्राचा प्रारंभ ०१ मे २०२५ दुपारी २:२१ वाजता सुरु होईल आणि समाप्ती ०२ मे २०२५ दुपारी १:०४ वाजता होईल. त्यामुळे रामानुजाचार्य यांची जयंती २ मे रोजी साजरी केली जाणार आहे.

रामानुजाचार्य कोण होते?

रामानुज हे एक महान तत्वज्ञानी आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म १०१७ मध्ये श्रीलंकेतील पेराम्बुदुर येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव भट्ट असल्याचे सांगितले जाते. रामानुजाचे वडील ते खूप लहान असतानाच वारले. त्यांचे प्रारंभिक शिक्षण कांची येथील यादवप्रकाश गुरूंकडून झाले. त्यानंतर ते अलवंधर यमुनाचार्य यांचे शिष्य बनले. वयाच्या १६ व्या वर्षी श्री रामानुजम यांनी सर्व वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. काही काळानंतर त्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग केला. पौराणिक मान्यतेनुसार रामानुज सुमारे १२० वर्षे जगले आणि ११३७ मध्ये त्यांचे निधन झाले. रामानुजांनी त्यांच्या आयुष्यात सुमारे नऊ पुस्तके लिहिली. ज्यांना नवरत्न म्हणतात. ते स्वतः भगवान विष्णूचे एक महान भक्त होते आणि त्यांनी त्यांच्या अनुयायांना विष्णूच्या भक्तीसाठी प्रेरित केले.

मृत्यूनंतर समजली गुरुआज्ञा

गृहस्थ जीवनाचा त्याग केल्यानंतर रामानुजाचार्य यांनी श्रीरंगमच्या यदिराजा संन्यासीकडून संन्यासाची दीक्षा घेतली. ते यमुनाचार्यांचे शिष्य देखील होते. असे म्हटले जाते की, जेव्हा यमुनाचार्य यांचे निधन होणार होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या एका शिष्यामार्फत रामानुजाचार्य यांना भेटण्यास बोलावले. परंतु, ते तिथे पोहोचण्यापूर्वीच यमुनाचार्य यांचे निधन झाले. जेव्हा रामानुजाचार्य तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की यमुनाचार्यांती तीन बोटे वाकलेली आहेत. रामानुजाचार्य यांना कळले की श्री यमुनाचार्य 'ब्रह्मसूत्र', 'विष्णु सहस्रनाम' आणि अलावंदरांच्या 'दिव्य प्रबंधम' या ग्रंथांचे भाष्य त्यांच्याकडून लिहू इच्छितात. यानंतर रामानुजांनी श्री यमुनाचार्य यांच्या पार्थिवाला वंदन केले आणि त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केली.

कसे आहे प्रेरणादायी कार्य?

त्यांच्या मुख्य रचनेत 'श्रीभास्य', वैकुंठ गद्यम्, वेदांत सार, वेदार्थ संग्रह, श्रीरंग गद्यम, गीता भाषा, नित्य ग्रंथम, वेदांत दीप, इत्यादी महान ग्रंथांचा उल्लेख केला जातो. रामानुजाचार्य यांनी वेदांत तत्त्वज्ञानावर आधारित 'विशिष्ट द्वैत वेदांत' हे नवीन तत्त्वज्ञान तयार केले. वेदांताव्यतिरिक्त ते ७व्या - १०व्या शतकातील गूढ आणि भक्तीपूर्ण अल्वर संतांपासून प्रेरित झाले आणि त्यांनी दक्षिणेतील पंचरात्र परंपरा स्वीकारली.रामानुजाचार्य यांनी स्थापन केलेल्या पंथाचे नाव श्री संप्रदाय आहे. रामुनुजाचार्यांनी श्रीरंगम, तिरुनारायणपुरम आणि तिरुपती मंदिर यांसारख्या अनेक जुन्या मंदिरांची पुनर्बांधणी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+