Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

या राज्यातील सरकार दलितांना मोफत इंग्लंडला पाठवणार, जाणून घ्या खास कारण

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Celebrated In Rajasthan : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजस्थानच्या सरकारने दलितांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोमवारी राजस्थान आंतरराष्ट्रीय केंद्रातून 'आंबेडकर तीर्थ योजना' सुरू केली आहे.

दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचतीर्थांना भेट देता यावी म्हणून या योजनाची घोषणा केली आहे. राजस्थानच्या भजनलाल सरकारने आता लंडनमधील ऐतिहासिक शैक्षणिक स्थळाला भेट देण्याची तयारी सुरू केली आहे. या काळात, महू, नागपूर, दिल्ली आणि मुंबई या चार तीर्थस्थळांना यात्रेकरूंना पाठवण्यात येणार आहे.

Rajasthan Cm Bhajan Lal

भाजप सरकार दलितांना परदेशी पाठवणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून महानिर्वाणापर्यंतची पाच प्रमुख ठिकाणे केंद्र सरकारने तीर्थक्षेत्रे म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये डॉ. आंबेडकरांचे जन्मस्थान महू, दीक्षाभूमी नागपूर, महा-परिनिर्वाण स्थळ दिल्ली, चैत्यभूमी मुंबई आणि शिक्षणभूमी लंडन यांचा समावेश आहे. दलित समाजातील लोकांना या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी राज्य सरकार तीर्थयात्रेची व्यवस्था करणार आहे. या पाच ठिकाणांपैकी महू, नागपूर, दिल्ली आणि मुंबई या चार ठिकाणांचा प्रवास आधीच सुरू झाला आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसेसना हिरवा झेंडा दाखवला. आता येत्या काळात सरकार लंडनला एक सहल देखील आयोजित करणार असल्याचं सांगितले आहे.

कार्यक्रमाच्यावेळी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री अविनाश गेहलोत म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे शिक्षणस्थळ असलेल्या लंडनच्या भेटीचाही या योजनेत समावेश केला जात आहे. हा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. डॉ. आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात राहत होते ते घर भारत सरकारने आधीच अधिग्रहित केले आहे आणि पंचतीर्थ म्हणून घोषित केले आहे. हा प्रवास संविधान, संघर्ष आणि शिक्षणासाठी, विशेषतः दलित तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे.

आंबेडकर तीर्थ योजना राजस्थान सरकारने पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. या योजनेतून एका वर्षात 1000 निवडक लोकांना आंबेडकर यात्रेवर पाठवण्याची योजना आखली आहे. ही योजना भाजपच्या निवडणूक आश्वासनाचा एक भाग होता. भाजपाने सत्तेत आला तर दलित समुदायाला डॉ. आंबेडकरांच्या पंचतीर्थांच्या यात्रेवर नेले जाईल, असं निवडूकीतील जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आलं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+