मोठी बातमी: रेल्वेमंत्र्यांकडून मिरज कॉर्डलाईन प्रकल्पाला मंजुरी! अर्धा तास वाचणार अन् हा आहे फायदा
Railway Minister approves Miraj Cordline project : रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य रेल्वे अंतर्गत 128.78 कोटी रुपये खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन (1.73 किमी) प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील जनसंपर्क विभागाकडून यासंदर्भात माहिती जारी करण्यात आली आहे.

पुणे-कोल्हापूर-पंढरपूरसाठी ठरणार महत्वाचा इंटरचेंज पाॅईंट
मल्टी ट्रॅकिंग, फ्लायओव्हर किंवा बायपास लाईन क्षमता वाढीच्या छत्राखाली प्रस्तावित केलेल्या या धोरणात्मक उपक्रमाचा उद्देश म्हणजे मिरज जंक्शनवर रेल्वेचे कामकाज लक्षणीयरीत्या सुलभ करणे आहे, जो मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंडा यासारख्या मार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा इंटरचेंज पॉइंट आहे, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नेटवर्क सुविधा सुधारणार
रेल्वे विभागाने म्हटले आहे की, सध्या, कुर्डुवाडी किंवा हुबळीहून येणाऱ्या आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांना मिरज येथे इंजिन किंवा ब्रेकव्हॅन उलटल्यामुळे सरासरी 120 मिनिटे थांबण्याचा वेळ येतो. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे हे ऑपरेशनल विलंब दूर होतील, ज्यामुळे नेटवर्क कार्यक्षमता सुधारेल.
प्रवासी रेल्वे सेवेचा मार्ग मोकळा! प्रवास होईल जलद
या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वेला अधिक महत्व प्राप्त होणार असून रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रदेशात अधिक कार्यक्षम मालगाडी आणि प्रवासी रेल्वे सेवांचा सुयोग्य ताळमेळ बसेल आणि प्रवाशी गाड्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे मिरज ते कोल्हापूर जलद प्रवास होईल आणि हीच मागणी गेल्या कित्येक काळांपासून प्रवाशांची होती ती आता पुर्ण होणार आहे.
मीरज काॅर्ड लाईनमुळे अर्धा तास वेळ वाचणार!
रेल्वेमंत्र्यांनी त्यासाठी 128.78 कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईनच्या प्रकल्पाला मान्यता दिली, यामुळे मालवाहतुकीला चालना मिळणार आहे. यासह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मीरज येथून 64 रेल्वेगाड्या धावतात. यामध्ये कोल्हापूर, तिरुपती, कोल्हापूर -धनाबाद, कोल्हापूर- कलबुर्गी, गाज्यांना मिरज जंक्शनमध्ये इंजिन बदलावे लागते.हे इंजिन बदलण्यासाठी साधारणतः 25 ते 30 मिनिटे लागतात. हा रेल्वे आणि प्रवाशांचा वेळ काॅर्डलाईनमुळे आता वाचणार आहे. यामुळे कोल्हापूर मार्गावर रेल्वे नियोजित वेळेच्या तुलनेत लाईन पुर्ण झाल्यानंतर लवकर पोहचतील.
हेही वाचा : भारतात कधी धावणार बुलेट ट्रेन? तारीख आली, मुंबईसह 'या' भागातून वाऱ्याच्या वेगाने जाणार रेल्वे












Click it and Unblock the Notifications