भारतात कधी धावणार बुलेट ट्रेन? तारीख आली, मुंबईसह 'या' भागातून वाऱ्याच्या वेगाने जाणार रेल्वे
Mumbai Railway News : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला बुलेट ट्रेन प्रकल्पाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. भारतात बुलेट ट्रेन कधी धावणार याची आता तारीख समोर आली आहे. बुलेट ट्रेन धावल्यानंतर भारत त्या 15 देशांच्या यादीत स्थान मिळवणार आहे.
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबई ते अहमदाबाद या 508 किलोमीटर लांबीचा अती जलद मार्ग काॅरीडाॅर तयार केला जात आहे. आता यासंबंधीत मोठी माहिती समोर आली आहे.

भारतात कधी धावणार बुलेट ट्रेन?
रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये साबरमती ते वापीदरम्यान 2028 दरम्यान भारतात पहिली बुलेट ट्रेन धावू शकते. तर पुर्ण मार्गावर 2030 पर्यंत बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात हिंदूस्तानने वृत्त दिले आहे.
राष्ट्रीय अतीजलद रेल्वे मंडळ अर्थात नॅशनल हाय-स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे राईडरशीप सर्वेक्षण केले जाणार आहे. यानंतर रेल्वेतील प्रवाशांची संख्या, रेल्वेचे तिकीट, वाहतूक आणि इतर गोष्टींचा अंदाज लावला जाणार आहे.
किती लांबीचा आहे बुलेट ट्रेनचा मार्ग?
रिपोर्टनुसार, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग 508 किलोमीटर आहे तर महाराष्ट्रातून र्ग 156 किलोमीटरपर्यंत हा मार्ग आहे. गुजरातमधून 348 किलोमीटर लांबीपर्यंत हा मार्ग जाणार आहे.
महाराष्ट्रात कुठे धावणार बुलेट ट्रेन?
अहमदाबाद ते मुंबईदरम्यान धावणारी बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे,विरार, बोईसर येथून धावणार आहे. त्यासाठी या ठिकाणी विशेष रेल्वेस्थानक तयार करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे गुजरातमधील भरुच, वापी, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती, बिलिमोरा आणि वापी येथेही बुलेट ट्रेनची रेल्वेस्थानके तयार केली जात आहेत.
महाराष्ट्रात कुठपर्यंत आले काम?
महाराष्ट्रात जमीन अधिग्रहनासाठी अडथळे आले होते, त्याशिवाय बुलेट ट्रेनच्या विरोधात विरोधी पक्षाने वेगळी भूमिका घेतली होती त्यामुळे मागील तीन वर्षांच्या काळात बुलेट ट्रेनच्या कामात गती आलेली नव्हती पण आता महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी कामांची गती वाढली आहे.
बीकेसी स्थानकावर 76 टक्के खोदकाम
मुंबईत बीकेसी स्थानकावर जवळपास 76 टक्के खोदकाम झाले असून 383 पियर्स वर्क 401 किमीचे फाऊंडेशन आणि 326 किमीपर्यंत गर्डर कास्टींगचे काम पुर्ण करण्यात आले आहे असे रेल्वेमंत्र्यांनी नुकतीच माहिती दिलेली आहे.
हेही वाचा : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कधी सुरु होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी अपडेट
हेही वाचा : Mumbai Local आज मेगाब्लाॅक! 'या' मार्गावरील गाड्या रद्द, कोणत्या लोकलच्या वेळा बदलल्या जाणून घ्या












Click it and Unblock the Notifications